Maharashtra CM:अजित पवारांनी बंड करताच, रोहित पवारांचा फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 11:30 AM2019-11-23T11:30:17+5:302019-11-23T12:01:21+5:30

सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाट्सआपवर पार्टी आणि कुटुंब फुटले असल्याचे स्टेट्स ठेवल्याने पवार कुटुंबांत फुट पडल्याचे सिद्ध झाले आहे.

Rohit Pawar changed his Facebook profile | Maharashtra CM:अजित पवारांनी बंड करताच, रोहित पवारांचा फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला !

Maharashtra CM:अजित पवारांनी बंड करताच, रोहित पवारांचा फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला !

googlenewsNext

-मोसीन शेख 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित वळण लागले असून आज सकाळीच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली. तर धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर आता रोहित पवार यांची भूमिका काय असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काही मिनटापूर्वी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरील प्रोफाईल फोटो बदलत शरद पवारांसोबत असलेला फोटो टाकला आहे. त्यामुळे ते शरद पवारांच्या सोबतचं राहणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील सत्तास्थापना निमत्ताने आज सकाळी घडलेल्या घडामोडी पाहता व सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाट्सआपवर पार्टी आणि कुटुंब फुटले असल्याचे स्टेट्स ठेवल्याने पवार कुटुंबांत फुट पडल्याचे सिद्ध झाले आहे. तर शरद पवार व अजित पवार असे दोन गट पवार कुटुंबांत निर्माण झाले आहे. त्यामुळे रोहित पवार हे नेमेके कुणाच्या सोबत जाणार अशी चर्चा पाहायला मिळत होती.

मात्र काही मिनटांपूर्वी रोहित पवार यांनी आपल्या फेसबुकच्या ऑफिशियल पेजवर प्रोफाईल फोटो बदलला असून, शरद पवार यांच्यासोबतचा फोटो त्यांनी अपलोड केला आहे. त्यामुळे रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत असणार असल्याचे बोलले जात आहे.

त्याचबरोबर त्यांनी एक तासापूर्वी सुद्धा शरद पवारांच्या सोबतचा त्यांनी  दुसरा फोटो अपलोड केला होता. त्यात महाराष्ट्राचा "लोकनेता" म्हणून त्यांनी पवारांचा उल्लेख केला होता. त्यामुळे पवार कुटुंबांत निर्माण झालेल्या दोन गटात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे शरद पवारांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Rohit Pawar changed his Facebook profile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.