अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 01:47 PM2019-10-27T13:47:25+5:302019-10-27T13:53:53+5:30

१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यात लढाई झाली होती.

repeat history in Ashok Chavan Bhokar Assembly Constituency | अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती

अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती

Next

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. त्यामुळे भोकरमध्ये पुन्हा १९७८ च्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. १९७८ ला झालेल्या निवडणुकीत  भोकरमधून शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यात थेट लढाई झाली होती. तर या विधानसभेत या दोन्ही नेत्यांच्या मुलांमध्ये लढाई झाल्याची पाहायला मिळाले. त्यामुळे भोकर मतदारसंघात इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.

१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यात लढाई झाली होती. तर यावेळी विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब गोरठेकर यांचे पुत्र माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपकडून उमेदवारी मिळवत भोकरमधून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे अशोक चव्हाण हे सुद्धा त्यांच्या पारंपारिक भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते.

१९७८ ला शंकरराव चव्हाण यांनी निवडणूक जिंकली होती. तर या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि बापूसाहेब गोरठेकर यांच्यात झालेली लढत इतिहासाची पुनरावृत्ती समजली जात आहे. विशेष म्हणजे या पुनरावृत्तीबाबत अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वीच संकेत दिले होते.

विधानसभा निवडणुकीच्या आधीच बापूसाहेब गोरठेकर आणि अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय वाद समोर आले होते. गोरठेकर यांनी भाजपमध्ये जाण्यापूर्वी म्हणजेच राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा चव्हाण यांच्यावर अनेकदा टीका केल्या होत्या. त्यानंतर ते भाजपमध्ये गेल्याने या दोन्ही नेत्यांमध्येचं भोकर मतदारसंघात थेट लढाई होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

भोकर विधानसभा निकाल

अशोक चव्हाण         ( काँग्रेस ) -  १ लाख ४० हजार

बापूसाहेब गोरठेकर ( भाजपा ) -   ४३ हजार ११४

Web Title: repeat history in Ashok Chavan Bhokar Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.