“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 07:58 PM2024-05-01T19:58:26+5:302024-05-01T19:59:06+5:30

Ramdas Athawale News: जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला.

ramdas athawale replied maha vikas aghadi over criticism on pm modi in rally for lok sabha election 2024 | “नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले

“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले

Ramdas Athawale News: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात एकमागून एक सभा घेत असून, महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडत आहेत. आताच्या घडीला भटकती आत्मा यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास आपल्या शैलीत कवितेतून महाविकास आघाडीला चिमटा काढला.

नरेंद्र मोदींचा वखवखलेला आत्मा भटकत आहे. असे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणतात. त्यांना उद्धव ठाकरे यांनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे. राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे. जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके... नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा... कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा..., असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच लोकशाही धोक्यात असती तर मोदी मते मागायला आले असते का? अशी विचारणाही रामदास आठवले यांनी केली आहे.

दिलेल्या नाऱ्याप्रमाणे ४०० जागा जिंकू जनतेचा आम्हाला कौल आहे

आपला देश संविधानानुसार चालतो. हे जर कुणाला मान्य नसेल, संविधान मान्य नसेल तर चलेजाव असे आम्ही सांगत आहोत. मी १७ राज्यांचा दौरा केला आहे. देशात वातावरण आमच्या बाजूने आहे. तामिळनाडूतही एनडीएच्या जागा येतील. तसंच उत्तर भारतातही जागा जिंकून येतील. आम्ही दिलेल्या नाऱ्याप्रमाणे ४०० जागा जिंकू जनतेचा आम्हाला कौल आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आम्ही मुळीच संविधान बदलणार नाही, गैरसमज पसरवू नका. मला जरी तिकीट दिलेले नाही, तरीही मी त्यांच्या बरोबर आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती, अशी खंत रामदास आठवले यांना बोलून दाखवली.
 

Web Title: ramdas athawale replied maha vikas aghadi over criticism on pm modi in rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.