'मोदींमुळे देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत नाही'; सुनील तटकरेंकडून पंतप्रधानांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:53 PM2024-05-05T18:53:21+5:302024-05-05T19:02:56+5:30

Sunil Tatkare : आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत कुणाची झाली नाही असा मोदींचा दरारा असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटलं.

Raigad Loksabha Election Appreciation of PM Modi by Sunil Tatkare | 'मोदींमुळे देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत नाही'; सुनील तटकरेंकडून पंतप्रधानांचे कौतुक

'मोदींमुळे देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत नाही'; सुनील तटकरेंकडून पंतप्रधानांचे कौतुक

Raigad Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे रविवारी राज्यभरात प्रचाराची सांगता झाली. अशातच शेवटच्या सांगता सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत विरोधकांवर निशाणा साधला  आहे. भारत देशाचे गौरवाचे स्थान अढळ ठेवण्यासाठी मोदींची प्रचंड मेहनत केल्याचे सुनील तटकरे यांनी यावेळी म्हटलं.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशाची सुत्रे हातात घेतली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीचा बदल झालेला पहायला मिळाला. जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत तुमच्या आणि माझ्या भारत देशाचे गौरवाचे स्थान अढळ ठेवण्यासाठी मोदींची प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी दाखवलेली परराष्ट्र धोरणे, परराष्ट्रनीती, शेजारची राष्ट्रे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत होती. पण गेल्या दहा वर्षांत आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत झाली नाही. हा नरेंद्र मोदींचा दरारा जग अनुभवत आहे. हे सगळे करत असताना देशातील सर्वसामान्य माणसासाठीही नरेंद्र मोदी काम करत आहेत," अशा शब्दात  खासदार सुनिल तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केलं. 

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. संविधानाच्या माध्यमातून १९५२ पासून आतापर्यंत १८ व्या लोकसभेला आपण सामोरे जात आहोत. १७ वेळा या देशातील सर्वसामान्य माणसांनी आपल्यापरीने कुणाचे सरकार या देशात आणलं. न मोजता येणार्‍या बोलीभाषांचा आपला देश... अनेक धर्मियांचा देश ...या देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडता टिकवायची असेल तर ते नेतृत्व ठरवण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिला. जनतेला दिलेल्या अधिकाराचा योग्य पध्दतीने वापर करत देशात झालेली अनेक स्थित्यंतरे तुम्ही -आम्ही अनुभवत आहोत आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. त्या संविधानाबद्दल आणि हेतूबद्दल आज शंका विरोधी पक्ष निर्माण करत आहेत," असेही सुनील तटकरे म्हणाले.

दरम्यान, चंद्रयान चंद्रावर गेले ते आपल्या शास्त्रज्ञांमुळे हे मान्यच परंतु त्या शास्त्रज्ञांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व श्रेय दिले पाहिजे होते. परंतु विरोधकांकडून संकोचित विचार पहायला मिळाला असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला. 

Web Title: Raigad Loksabha Election Appreciation of PM Modi by Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.