भक्तीरंगात लांडोरही तल्लीन! भजन सुरू असताना थेट व्यासपीठावर पोहोचला लांडोर, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 04:26 PM2022-05-22T16:26:56+5:302022-05-22T16:49:28+5:30

माणूस बोलून किंवा हावभावातून बरच काही व्यक्त करतो. मात्र, पक्षी,प्राण्यांच्या भावना समजून घेणं सोपं नसतं.

peacock reached on the stage directly in bhajan program | भक्तीरंगात लांडोरही तल्लीन! भजन सुरू असताना थेट व्यासपीठावर पोहोचला लांडोर, पाहा VIDEO

भक्तीरंगात लांडोरही तल्लीन! भजन सुरू असताना थेट व्यासपीठावर पोहोचला लांडोर, पाहा VIDEO

Next

संगमनेर/आश्वी : 

माणूस बोलून किंवा हावभावातून बरच काही व्यक्त करतो. मात्र, पक्षी,प्राण्यांच्या भावना समजून घेणं सोपं नसतं. संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापुर येथे संगीत भजनाच्या कार्यक्रमात मंत्रमुग्ध करणारे भजन ऐकून लांडोरही तल्लीन झाला आणि थेट व्यासपीठावर आल्याचा अत्यंत खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

तालुक्यातील उंबरी बाळापुर येथे प्रगतशील शेतकरी उद्योजक स्व.भिकाजी कोंडाजी भुसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून भुसाळ कुटुंबाने संगीत विशारद विनोद राऊत आणि स्वप्नाली राऊत यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी  (दि.२०) रोजी केले होते. या वेळी संगीत भजनास आमदार डॉ. सुधीर तांबे,दुर्गाताई तांबे, प्रशांत भुसाळ,धनंजय भुसाळ,विशाल भुसाळ, बाळासाहेब भुसाळ,शशांक भुसाळ, सुनील भुसाळ सहपंचक्रोशीतील गावांमधील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, भजन सुरु असताना अचानक मंडपात एका लांडोरानं प्रवेश केला. आजूबाजूला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असतांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनात मोरही तल्लीन झाला आणि थेट व्यासपीठावर आला. हा सर्व प्रकार पाहून श्रोतेही चकीत झाले.

 

Web Title: peacock reached on the stage directly in bhajan program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.