अरे वेड्या मी सात वेळेस निवडून आलोय...; संजय राऊतांच्या 'लायकी काय'ला गिरीष महाजनांचे प्रत्त्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 03:59 PM2024-04-08T15:59:06+5:302024-04-08T15:59:41+5:30

Girish Mahajan Talk on Sanjay Raut: राज्यात तीन आघाड्या-युती आणि त्या आघाड्यांमध्येही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत.

Oh man, I've been elected seven times...; Girish Mahajan's response to Sanjay Raut's 'Laiki Kay' | अरे वेड्या मी सात वेळेस निवडून आलोय...; संजय राऊतांच्या 'लायकी काय'ला गिरीष महाजनांचे प्रत्त्युत्तर

अरे वेड्या मी सात वेळेस निवडून आलोय...; संजय राऊतांच्या 'लायकी काय'ला गिरीष महाजनांचे प्रत्त्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच राज्यात तीन आघाड्या-युती आणि त्या आघाड्यांमध्येही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत. राऊत हे एकाचवेळी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवरही टीका करण्याचे सोडत नाहीत. वंचितशी चर्चांवेळी तर त्यांनी टीका केलीच होती. अशातच आता भाजपाचे नेते मंत्री गिरीष महाजन यांनी राऊतांना प्रत्यूत्तर दिले आहे. 

संजय राऊत बोलत होते याची लायकी काय याच काय म्हणून मी म्हटलं अरे वेड्या मी सात वेळेस निवडून आलो आहे. तुम्ही फक्त एकदा उभे राहा, महाराष्ट्रातला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा. तेथे उभे राहा निवडून येवून दाखवा. घरातून उठले की सकाळी कोंबड्या सारखी बांग देत बसतात, असे आव्हान महाजन यांनी राऊतांना दिले.  

मला काय सांगता, आमची लायकी काय पाहता. आम्ही सात-सात वेळा एकाच मतदार संघातून निवडून येतो. तुम्ही आयते राज्यसभेवर जाता आणि आम्हाला लायकी शिकवता का, अशी बोचरी टीका महाजन यांनी राऊतांवर केली आहे. 

एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकी, खासदारकीची. निवडणूक लढवून दाखव मग आम्हाला सांग आमची लायकी काय आहे, असे खुले आव्हान महाजन यांनी दिले. महाजन हे नांदेड येथील प्रचारसभेत बोलत होते. 

Web Title: Oh man, I've been elected seven times...; Girish Mahajan's response to Sanjay Raut's 'Laiki Kay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.