राज्यात १०० हून अधिक ठिकाणी गोवर उद्रेक; दिवसभरात १५ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 05:52 AM2022-12-10T05:52:20+5:302022-12-10T05:52:33+5:30

मुंबईतील ५६ ठिकाणावरील उद्रेकातून ४,७९३ संशयित असल्याचे सांगण्यात आले.

Measles outbreak in more than 100 places in the state; 15 patients recorded during the day | राज्यात १०० हून अधिक ठिकाणी गोवर उद्रेक; दिवसभरात १५ रुग्णांची नोंद

राज्यात १०० हून अधिक ठिकाणी गोवर उद्रेक; दिवसभरात १५ रुग्णांची नोंद

googlenewsNext

मुंबई :  राज्यात शुक्रवारी १५ गोवर रुग्णांची नोंद झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे राज्यात आता एकूण ९४० एवढ्या गोवर रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी राज्यातील एकूण गोवर संख्या ९२५ एवढी सांगण्यात आली होती. तर मुंबईत ६ रुग्णांची गोवर रुग्णांची नोंद होऊन मुंबईत आतापर्यंत ४४२ एकूण गोवर रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारपर्यंत मुंबईत ४३६ एवढे एकूण गोवर रुग्ण होते. राज्यात आतापर्यंत १२१ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाल्याची नोंद आहे.

दरम्यान मुंबईतील ५६ ठिकाणावरील उद्रेकातून ४,७९३ संशयित असल्याचे सांगण्यात आले. यात एम पूर्व, एल आणि एच पूर्व वॉर्डसह इतर १६ वॉर्ड असल्याचे सांगण्यात आले. तर राज्यात मालेगाव मनपा, भिवंडी, ठाणे मनपा आणि जिल्हा, वसई विरार मनपा क्षेत्र, पनवेल मनपा, नवी मुंबई मनपा, औरंगाबाद मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, बुलढाणा, मीरा भाईंदर, रायगड, जळगाव मनपा, धुळे मनपा तसेच धुळे अशी १७ ठिकाण गोवरसाठी संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले.

५०० रुग्ण महिनाभरात झाले गोवरमुक्त
पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्याभरात ५२५ रुग्ण गोवरमुक्त झाले आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये गोवरमुक्त होण्याचे प्रमाण वाढले असून  दररोज सरासरी ३० रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात येत आहे.

Web Title: Measles outbreak in more than 100 places in the state; 15 patients recorded during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.