'मतदाना'चे व्हिडिओ-फोटो होतायत व्हायरल;मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:04 PM2019-10-21T12:04:08+5:302019-10-21T12:10:13+5:30
मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7 वाजेपासून सुरवात झाली आहे. मात्र मतदान करतानाचे व्हिडिओ-फोटो सोशल मीडियात व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मतदान व्हायरल होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगानं मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास निर्बंध घातले आहेत. तरीही काही लोकं मोबाइल मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जात असून, आपल्या मतदानाचं चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातील काही फोटो सद्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनी मोबाइलबंदी केली आहे. मात्र, पोलिसांची नजर चुकवून मतदार मोबाइल घेऊन केंद्रांवर जात आहेत. मोबाइल बंदीचा फारसा परिणाम झालेला दिसत नसल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मतदान गुप्ततेचे भंग होत असल्याचे दिसून येत आहे.