"४०० पारच्या घोषणा पोकळ, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या पक्षावर इतर पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ’’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:41 PM2024-03-28T19:41:13+5:302024-03-28T19:42:08+5:30

Nana Patole Criticize BJP: भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषित विश्वगुरू असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निवडणुक लढवण्यालाठी उमेदवारही नाहीत. भाजपाला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत त्यामुळे ४०० पारच्या घोषणा पोकळ आहेत हे स्पष्ट दिसत आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. 

lok sabha election 2024: Time to import candidates from other parties on the party of self-proclaimed Vishwaguru | "४०० पारच्या घोषणा पोकळ, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या पक्षावर इतर पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ’’

"४०० पारच्या घोषणा पोकळ, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या पक्षावर इतर पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ’’

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या अब की बार ४०० पार घोषणेची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषित विश्वगुरू असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निवडणुक लढवण्यालाठी उमेदवारही नाहीत. भाजपाला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत त्यामुळे ४०० पारच्या घोषणा पोकळ आहेत हे स्पष्ट दिसत आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषित विश्वगुरू असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निवडणुक लढवण्यालाठी उमेदवारही नाहीत. भाजपाला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत त्यामुळे ४०० पारच्या घोषणा पोकळ आहेत हे स्पष्ट दिसत आहे. भाजपाने १० वर्षात देशाची बरबादी केली, जाती-धर्मामध्ये वाद लावले, देशाला व जनतेला आर्थिक कमजोर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपवण्याचे काम भाजपा करत आहे, त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागेल आणि जनता जनार्दनच भाजपला इंगा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचे चित्र देशात आहे. या पराभवाच्या भितीने भाजपाला ग्रासले असून त्याच भितीतून ते विरोधी पक्षांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई ही राजकीय सुडबुद्धीतून केलेली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

नाना पटोले म्हणाले की, रामटेक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असले तरी घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्षाने त्या मतदारसंघात दुसरा अर्ज आधीच दाखल केलेला आहे. परंतु भारतीय जनता पक्ष घाबरलेला असून ते खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत. स्वाभाविक आहे की सत्तेतून बाहेर जाण्याची भिती भाजपाला सतावत असल्याने अशा प्रकाराचे राजकारण ते करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली तर शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने नोटीस पाठवली, हे सर्व प्रकार पराभवाच्या मानसिकतेतून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी भाजपा करत आहे.

Web Title: lok sabha election 2024: Time to import candidates from other parties on the party of self-proclaimed Vishwaguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.