'मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही'; इंदुरकर महाराजांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:14 AM2021-11-03T10:14:03+5:302021-11-03T10:14:59+5:30
इंदुरकर महाराजांचा नाशिकमधील कीर्तनाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्यात त्यांनी लसीकरणावर अजब वक्तव्य केलं आहे.
नाशिक: कोरोना महामारीवर लस(Corona vaccination) हे सध्या एकमेव उपाय आहे. आतापर्यंत भारतात शंभर कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. पण, अद्यापही काहीजण आहेत, ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. या लस न घेतलेल्या लोकांमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज(Indurikar Maharaj) यांचाही समावेश आहे. आपल्या कीर्तनामुळे नेहमीच चर्चेत राहणारे इंदुरकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, कारण आहे कोरोना लस.
इंदुरकीर महाराज काही महिन्यांपूर्वी पुत्र प्राप्तीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे चर्तेत आले होते. बऱ्याच दिवस त्या प्रकरणाची चर्चा सुरू होती. आता कोरोना लसीकरणावरुन पु्न्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. नाशिकमध्ये इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता, त्या कीर्तनातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यात त्यांनी 'कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही आणि घेणारही नाही,' असं म्हटलं आहे.
आपल्या कीर्तनात महाराज पुढे म्हणतात की, प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या मेंदूची क्षणता वेगवेगळी आहे. मी तर अजून लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काय करायचं. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. एकीकडे सरकार देशभरात लसीकरण मोहीम राबवत आहे. कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. पण, समाज प्रबोधनाचे धडे देणऱ्या कीर्तनकारानेच कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणार नाही असे सांगितल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.