एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेने दोन कायद्यांची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:50 AM2023-11-02T08:50:11+5:302023-11-02T08:50:39+5:30

एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला असता तर? असेही केतकीने मराठा आंदोलकांना म्हटले आहे. 

How do you get reservation by breaking ST bus? Ketaki Chitale demanded two laws after violance | एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेने दोन कायद्यांची केली मागणी

एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेने दोन कायद्यांची केली मागणी

शांततेत सुरु असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन गेल्या दोन दिवसांपूर्वी हिंसक झाले होते. बीडमध्ये दोन आमदारांची घरे जाळण्यात आली होती. तसेच राज्यभारत ठीकठिकाणी एसटी बसेस फोडणे, जाळण्याचे प्रकार घडले होते. यामुळे चार जिल्ह्यांत संचारबंदी आणि इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. यावरून राज्य सरकारनेही उपद्रवींवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून आता अभिनेत्री केतकी चितळेने देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

केतकीने फेसबुकवर याबाबत पोस्ट केली आहे. इन्स्टावरील एक व्हिडीओ शेअर करत केतकीने एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? असा सवाल विचारला आहे. इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला  युनिफॉर्म सिव्हील लॉ आणि युनिफॉर्म क्रमिनल लॉची गरज आहे, असे ती म्हणाली. 

याचबरोबर सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला असता तर? असेही केतकीने मराठा आंदोलकांना म्हटले आहे. 

त्यापूर्वी चार दिवस आधी देखील केतकीने या दोन कायद्यांची पोस्ट केली होती. आम्ही नव श्रीमंत नाही, त्यामुळे पैशाचा माज नाही. आम्ही २०० वर्षापूर्वी जसे जगत होतो ( आजच्या भाषेत लाईफस्टाईल) तसेच आजही जगतो, त्यामुळे २०० वर्ष आणि आज यातील फरक दिसत नाहीत. स्वातंत्र्यापूर्वी किंवा नंतर आमच्या बाजूने कायदा कधीच नव्हता, त्यामुळे त्याचे कौतुक नाही. खरी मायनॉरिटी असून आम्हाला फुकट सुखसुविधा नको, त्यामुळे आम्ही भिकारी नाही, असे ती म्हणाली होती. 
 

Web Title: How do you get reservation by breaking ST bus? Ketaki Chitale demanded two laws after violance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.