बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा..हॉँ भतीजे : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 08:41 PM2019-09-14T20:41:38+5:302019-09-14T20:47:57+5:30
उत्स्फूर्त स्वागत पाहता बारामतीमध्ये परिवर्तनाची हवा दिसत आहे..
बारामती : हम मोदीजी के बाशिंदे है ,हमारा अवाज कोई बंद नही कर सकता,असा इशारा देत बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे, अशा शेरोशायरीतुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी बारामतीत आली असता स्वागत सभेत ते बोलत होते. सभेसाठी यासाठी लावलेली ध्वनीक्षेपक यंत्रणा काढण्यासाठी ´राष्ट्रवादीसह मनसे पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. हा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, सभेचा राष्ट्रवादीने धसका घेतला आहे.साऊंड सिस्टीम काढून घेण्यास सांगितले. मात्र, मी माझी साउंड सिस्टीम घेऊनच चालतो आणि जनतेपर्यंत पोहचतो. आता छत्रपतींचे घराणे देखील भाजपसोबत आहे. आपल्याला माहिती आहे.
फडणवीस म्हणाले, उत्स्फूर्त स्वागत पाहता बारामतीमध्ये परिवर्तनाची हवा दिसत आहे, हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की कोणीही त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाही. धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती भाजप सरकारने लागु केल्या. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५०हजार कोटीची थेट मदत केली. ह्यअजितदादाह्णचे सरकार होते त्यावेळी शेतकºयांना १२०० कोटी प्रतिवर्ष मिळत असत, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला १० हजार कोटी शेतकऱ्यांना दिले.राज्याच्या सिंचनाचे काय झाले हे सर्वांना ज्ञात आहे. बंद पडलेले सिंचन प्रकल्प आमच्या शासनाने सुरु केले.
पराभवाला इव्हीएमला जबाबदार धरणाऱ्यांच्या खोपडीत बिघाड : फडणवीस
पराभवास इव्हीएम मशीनला जबाबदार धरणाऱ्या विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धु विद्याथ्यासारखी आहे. त्यांच्या खोपडीमध्ये बिघाड झाला आहे, टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. जम्मू- काश्मीरच्या विलीनीकरणासाठी मतदान का केले नाही. तुम्ही समोर येऊन का बोलला नाही, असा सवाल त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसला केला.