ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:58 PM2020-06-23T16:58:41+5:302020-06-23T17:04:01+5:30

आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात.

Devendra Fadnavis comment on being a Brahmin and caste politics in maharashtra | ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

googlenewsNext

मुंबईः मराठा समाजाचं वर्चस्व राहिलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण नेत्यानं मुख्यमंत्री होणं, पाच वर्षं हे पद भूषवणं, इतकंच नव्हे तर सत्ता गेल्यावरही आपलं वजन कायम राखणं यावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली आहे. कारण, आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपलं ब्राह्मण असणं आणि एकूण जातीव्यवस्थेवर अत्यंत ठाम  मत मांडलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘थेट’ भाजपाला सत्तास्थापनेची ऑफर होती. थेट म्हणजे शरद पवारांनी दिली होती. या संदर्भात योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. अगदी वरिष्ठ पातळीवर बोलणी झाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी अचानक आपली भूमिका बदलली आणि आम्ही ‘कॉर्नर’ झालो, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’ला दिलेल्या मुलाखतीत केला. तेव्हा, शरद पवारांनी भूमिका बदलण्याला तुमचं ‘फडणवीस’ असणं जबाबदार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘‘फडणवीस आडनाव असल्यामुळे काय-काय भूमिका बदलतात, हे बऱ्याचदा बघितलं. पवारांच्याही आणि इतरांच्याही. पण, गेलं ते गेलं. एवढं मात्र नक्की की, गेल्या पाच वर्षांत माझ्यावर अटॅक करायला एकच शस्त्र  त्यांच्याकडे होतं. मला याचा आनंद आहे. माझ्यावर टीका करण्यासाठी केवळ आणि केवळ माझ्या जातीचाच उपयोग त्यांना करावा लागला. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांच्या पुरोगामित्वाचा बुरखा फाटला.’’

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; भाजपासोबत सरकार बनवायची थेट शरद पवारांची होती ऑफर, पण...

महायुतीचं सरकार असताना राष्ट्रवादी भाजपासोबत यायला तयार होती, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले...

तुम्हाला ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का, या प्रश्नावरही देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सुस्पष्ट उत्तर दिलं.  जातीचा अभिमान वाटण्याचे दिवस नाहीत. तुमचं कर्तृत्त्व चांगलं असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्याकडे जातिव्यवस्थेचा जरा अतिरेकच दिसतो. कुणी खालचा, कुणी वरचा, हा हिंदू धर्मच नाही. या उच्च-नीचतेचा तिरस्कारच केला पाहिजे. कर्तृत्त्वाचा अभिमान बाळगला पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं.  

राज ठाकरेंच्या भेटीमागे दडलंय काय?

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेने झेंडा बदलला. हिंदुत्वाचा नारा दिला. त्यामुळे, या भेटीमागे काही रहस्य होते का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, "राज ठाकरे यांना आपण जवळून ओळखता. कुणाच्या म्हणण्याने ते काही करतील असे नाही. राज ठाकरे यांना त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कुठे पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कशी भरुन काढायची हे समजते. ते कुणाच्या सांगण्यावरून काही करतील असे वाटत नाही. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढला."

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

'ट्रोलिंगसाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेनं प्रचंड फेक अकाऊंट तयार केलेत'

Read in English

Web Title: Devendra Fadnavis comment on being a Brahmin and caste politics in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.