आयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 06:55 PM2019-10-23T18:55:09+5:302019-10-23T18:56:34+5:30

गेल्या काही वर्षांत आयआयटींची संख्या वाढली, तसाच एनएसडीचाही विस्तार होणे आवश्यक आहे....

Common Entrance Examination for NSD admission on IIT background? | आयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा?

आयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा?

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या काही काळात त्या संदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता

पुणे : आयआयटीच्या धर्तीवर राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार सुरू असून, येत्या काही काळात त्या संदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
एनएसडीचे संचालक प्रा. सुरेश शर्मा यांनी ही माहिती दिली. एनएसडीतर्फे आयोजित नाट्य लेखन कार्यशाळेसाठी शर्मा पुण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विकेंद्रीकरण हा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रलंबित मुद्दा आहे. देशात नाट्य प्रशिक्षणासाठी केंद्रीय स्तरावरील एकच संस्था असायला हवी आणि बाकी ठिकाणी प्रादेशिक केंद्र असायला हवीत. असे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र मी त्याच्याशी सहमत नाही. एनएसडीची सध्या चार केंद्रे सुरू असली, तरी त्याला प्रादेशिक केंद्र म्हटले जाते हे योग्य नाही. दिल्ली व्यतिरिक्त अन्य आयआयटींना प्रादेशिक आयआयटी म्हटले जात नाही. गेल्या काही वर्षांत आयआयटींची संख्या वाढली, तसाच एनएसडीचाही विस्तार होणे आवश्यक आहे. 
    एनएसडीमध्ये पदवीनंतर प्रवेश दिला जातो. एनएसडीमध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवी मिळते. मात्र इतर शाखांच्या अभ्यासक्रमात दोन वर्षांनंतर पदव्युत्तर पदवी मिळते. एनएसडीच्या चारही केंद्रात  एक वर्षांचे अभ्यासक्रम सुरू आहेत. तो अभ्यासक्रम दोन वर्षांचा करून दिल्लीचे सेंटर केवळ स्पेशलायझेशनसाठी ठेवण्याचा विचार आहे.  एनएसडीचा अन्य राज्यांमध्ये कशा पद्धतीने विस्तार करता येऊ शकेल, या दृष्टीनेही  विचार सुरू आहे. मात्र, निश्चित काही धोरण ठरवण्यात आलेले  नाही. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय), सत्यजित रे चित्रपट संस्था (एसआरएफटीआय) यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा सुरू केली आहे. त्या धर्तीवरच चार केंद्रे आणि दिल्लीतील मुख्य केंद्र्र यांतील अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेता येईल का? अशीही कल्पना आहे.
    याशिवाय गेल्या काही वर्षांत मनोरंजन क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. सर्वसमावेशक नाट्य प्रशिक्षणासह स्पेशलायझेशनही महत्त्वाचे झाले आहे. नेटफ्लिक्ससारख्या माध्यमांतून अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्याने नाट्य प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात या तंत्रज्ञानाचे किमान  प्रशिक्षणही असावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमांसाठीचे पटकथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय या अनुषंगाने अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

Web Title: Common Entrance Examination for NSD admission on IIT background?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.