Breaking: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; मुक्ताईनगरमधून मुलगी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 03:15 PM2019-10-24T15:15:41+5:302019-10-24T15:55:51+5:30

शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत

Breaking: Eknath Khadse big set back; From Muktinagar rohini khadase lost seat | Breaking: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; मुक्ताईनगरमधून मुलगी पराभूत

Breaking: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; मुक्ताईनगरमधून मुलगी पराभूत

googlenewsNext

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या व मुक्ताईनगर मतदार संघातील भाजप उमेदवार अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी १९८७  मतांनी पराभव केला. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर मुक्ताईनगरात राष्ट्रवादी व चंद्रकांत पाटील समर्थकांनी एकच जल्लोष सुरु केला आहे.

भाजपाने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नव्हती. शेवटच्या यादीपर्यंत त्यांना वाट पहायला लावली होती. यानंतर भाजपाने रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिल्याचा गौप्यसोफोट केला होता. आजच्या निकालावेळी खडसे कन्या 500-1000 मतांच्या फरकाने पुढे मागे जात होत्या. मात्र, अखेर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळविला. 

रोहिनी खडसे यांच्या पराभवामुळे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या विधानसभेमध्ये मंत्रीपद गमवावे लागले होते. यानंतर खडसे सत्ताकारणापासून बाजुलाच पडले होते. आता पराभवामुळे तर विधानसभेतील राजकीय अस्तित्वच संपुष्टात आले आहे.

पराभवानंतर एकनाथ खडसेची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी या जागेवरून अडचणी येऊ शकतात, असा संदेश पक्ष श्रेष्ठींकडे पोहोचविला होता. मात्र, पक्षाचा निर्णय असल्याने काही होऊ शकले नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही निर्ण य चुकतात, कार्यकर्त्यांना चांगले नेतृत्व हवे असते. शेवटी जनतेचा निर्णय़ अंतिम असतो, असेही खडसे म्हणाले.

Web Title: Breaking: Eknath Khadse big set back; From Muktinagar rohini khadase lost seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.