Maharashtra Political Crisis: “नड्डांची वाणी खरी करुन दाखवली! शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचाच”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:25 AM2022-08-10T11:25:45+5:302022-08-10T11:26:28+5:30

शिवसेनेप्रमाणे बिहारमधील नितिश कुमार यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडणार, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

bihar political crisis ncp amol mitkari claims that bjp devendra fadnavis tried to finished shiv sena | Maharashtra Political Crisis: “नड्डांची वाणी खरी करुन दाखवली! शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचाच”

Maharashtra Political Crisis: “नड्डांची वाणी खरी करुन दाखवली! शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचाच”

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. त्याचवेळी दुसरीकडे बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. केवळ भाजप नाही, तर एनडीएला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी महागठबंधन केले आणि राजकीय वर्तुळाला धक्का दिला. राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करत १६४ आमदारांचे समर्थन पत्रही दिले. यावरून आता विरोधकांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत, राज्यात देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून नितीशकुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला, असा दावा केला आहे. असे असताना भाजपने आपण महाराष्ट्रात शिवसेना का फोडली हे सांगत नितीश कुमार यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी NDA आघाडी अंतर्गत निवडणूक लढवली होती आणि जनतेने JDU आणि BJP ला पाठिंबा दिला होता. जेडीयूने बिहारचा विश्वासघात केला आहे. मतदारांनी दिलेल्या मतांशी खेळले आहेत, असा आरोप बिहारचे भाजपा नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. हाच धागा पकडून अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे. 

शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला

अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, भाजप अध्यक्ष JP नड्डा बोलले, देशातील सर्व घटक पक्ष संपून जातील आणि केवळ भाजप उरेल. याचं उदाहरण राज्यांत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला. यासाठी ईडी, CBI चा वापर केला, आता सुशील मोदी तेच बोलले. शिवसेनेप्रमाणे बिहारमधील नितिश कुमार यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडणार, असा मोठा दावाही अमोल मिटकरी यांनी केला आहे. 

दरम्यान, आम्ही ७४ जागा जिंकण्यात यशस्वी झालो, पण पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आणि एनडीए आघाडीत नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. पण जे काही घडले तो बिहारच्या जनतेशी आणि भाजपसोबतचा विश्वासघात आहे. शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले, असा इशारा सुशीर मोदी यांनी दिला. 
 

Web Title: bihar political crisis ncp amol mitkari claims that bjp devendra fadnavis tried to finished shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.