बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 09:27 PM2019-10-06T21:27:28+5:302019-10-06T21:29:23+5:30
अजूनही दोन्ही पक्षातील बंडखोरांनी त्यांची उमेद्वारीं मागे घेतलेली नाही.
मनोहर कुंभेजकर : गेल्या शुक्रवारी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सूतोवाच केले होते.मात्र अजूनही दोन्ही पक्षातील बंडखोरांनी त्यांची उमेद्वारीं मागे घेतलेली नाही.
पश्चिम उपनगरात शिवसेना व भाजपात बंडखोरी झाल्याने त्यांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे त्यांना मनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धर्तीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
वर्सोवा विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेना महिला विभागसंघटक व जेष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांनी बंड करून शक्ति प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज गेल्या शुक्रवारी सादर केला.वर्सोव्यातून भाजपाच्या दिव्या ढोले यांनी लव्हेकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर करून बंडखोरी केली आहे.
तर अंधेती पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या विरोधात भाजपाचे माजी बंडखोर नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली होती.जातीच्या अवैध दाखल्यामुळे मुरजी पटेल व त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांचे नगरसेवक पद रद्ध झाले आहे.
महायुतीच्या गठबंधनात शिवसंग्राम कडून लव्हेकर यांना परत येथून उमेदवारी जाहिर झाली आहे.राजुल पटेल यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते,तर मुरजी पटेल यांनी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
मुरजी पटेल यांनी जर त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर राजुल पटेल यांचा उमेदवारी अर्ज त्या मागे घेण्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेकडून सांगण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या एका नेत्याने लोकमतशी बोलतांना दिली.