अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार, उदनराजेंना दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 03:45 PM2024-04-17T15:45:00+5:302024-04-17T15:48:43+5:30

Abhijeet Bichukale News: सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या, असे आवाहन अभिजित बिचुकले यांनी केले.

abhijeet bichukale declared that will contest lok sabha election 2024 from satara | अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार, उदनराजेंना दिला सल्ला

अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार, उदनराजेंना दिला सल्ला

Abhijeet Bichukale News: साताऱ्याची जागा कुणाकडे जाणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा होती. भाजपाने उदयनराजे यांना उमेदवारी घोषित करून या चर्चांना पूर्णविराम दिला. साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे आणि महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे. यातच आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, साताऱ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली. 

मीडियाशी बोलताना अभिजित बिचुकले म्हणाले की, कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत, याच्याशी काही घेणेदेणे नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका लढवल्या आहेत. माझे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला १२ हजारांहून जास्त मतदान केले होते. छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान टिकवायचे आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र घेऊन देशाला नवी दिशा आणि दशा द्यायची आहे, असे अभिजित बिचुकले यांनी सांगितले.

आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या

या लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो. माझ्या संपूर्ण फॅन्सनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा. सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या. १९ तारखेला अर्ज भरणारच, असा एल्गार करत, शरद पवार आणि उदयनराजेंचे हाडवैर आहे. भाजपाकडून तिकीट मिळावे अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला, याचे आत्मपरिक्षण उदयनराजेंनी केले पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचे आत्मपरिक्षण केले पाहिजे. शक्तिप्रदर्शन काय असते? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे. या सगळ्यांमध्ये एकटा लढत आहे. यावेळी मला संधी द्या, असे आवाहन अभिजित बिचुकले यांनी केले. 

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. राजेंनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती. सातारा मतदारसंघात उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून प्रचारालाही लागले होते. गावोगावी भेटी, लोकांशी संवाद सुरू केला होता. साताऱ्याची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे राहणार की भाजपा लढवणार हा प्रश्न होता. उदयनराजे भोसले यांनी कमळ चिन्हाशिवाय इतर चिन्हावर लढण्यास नकार दिल्याची माहिती होती. त्यामुळे या जागेवरून महायुतीत चर्चा सुरू होती. अखेर ही जागा महायुती भाजपाकडे गेली.
 

Web Title: abhijeet bichukale declared that will contest lok sabha election 2024 from satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.