शिंदेंच्या गटात 9, ठाकरेंकडे उरले फक्त 5 मंत्री, जाणून घ्या कुणाच्या गटात कोणते मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:52 AM2022-06-27T06:52:32+5:302022-06-27T06:53:14+5:30

शिवसेनेतील बंडानंतर यातील तब्बल ९ मंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.  

9 in Shinde's group, only 5 ministers left for Thackeray | शिंदेंच्या गटात 9, ठाकरेंकडे उरले फक्त 5 मंत्री, जाणून घ्या कुणाच्या गटात कोणते मंत्री

शिंदेंच्या गटात 9, ठाकरेंकडे उरले फक्त 5 मंत्री, जाणून घ्या कुणाच्या गटात कोणते मंत्री

googlenewsNext

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह एकूण १५ मंत्रिपदे आहेत. मात्र, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एक मंत्रिपद रिक्त असल्याने सध्या शिवसेनेकडे १४ मंत्री आहेत. यात शिवसेनेने आपल्या कोट्यातून ३ अपक्ष आमदारांना मंत्रिपद दिले होते. मात्र, आता शिवसेनेतील बंडानंतर यातील तब्बल ९ मंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.  

उदय सामंत शिंदेंच्या गटात
अगदी कालपर्यंत शिवसेनेसोबत असलेले आणि राष्ट्रीय कार्यकारिणीलाही उपस्थिती लावलेले कॅबिनेट मंत्री उदय सामंत हे रविवारी थेट गुवाहाटी गाठत एकनाथ शिंदेंच्या गटात डेरेदाखल झाले.  

दोन मंत्री विधानसभेतील
उद्धव ठाकरेंना समर्थन असलेल्या मंत्र्यांपैकी आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव लोकांमधून निवडून आलेले मंत्री आहेत. तर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले अपक्ष आमदार शंकरराव गडाख हेही विधानसभा सदस्य आहेत.

शिंदे यांच्यासोबत असलेले मंत्री 
एकनाथ शिंदे - नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मतदारसंघ : कोपरी-पाचपाखाडी, ठाणे)

उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण मतदारसंघ : रत्नागिरी) 

संदीपान भुमरे -  रोजगार हमी, फलोत्पादन मतदारसंघ : पैठण, जि. औरंगाबाद

गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता मतदारसंघ : जळगाव ग्रामीण)

दादा भुसे - कृषी, माजी सैनिक कल्याण मतदारसंघ : मालेगाव बाह्य, नाशिक 

शंभूराज देसाई -(राज्यमंत्री) गृह (ग्रामीण) मतदारसंघ : पाटण, जि. सातारा

अब्दुल सत्तार - (राज्यमंत्री) महसूल मतदारसंघ : सिल्लोड, जि. औरंगाबाद

बच्चू कडू - (राज्यमंत्री) जलसंपदा मतदारसंघ : अचलपूर, जि. अमरावती

राजेंद्र यड्रावकर - (राज्यमंत्री) मतदारसंघ : शिरोळ, जि. कोल्हापूर

ठाकरे यांच्यासोबत असलेले मंत्री -
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) - सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय, खाती (विधान परिषद सदस्य)

आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार (विधानसभा सदस्य) मतदारसंघ : वरळी, मुंबई

शंकरराव गडाख - मृदा व जलसंधारण (शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री) मतदारसंघ : (विधानसभा सदस्य)   नेवासा, जि. अहमदनगर)   

सुभाष देसाई -उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
(विधान परिषद सदस्य)

अनिल परब -परिवहन, संसदीय कामकाज (विधान परिषद सदस्य)

कोणत्या प्रदेशातील कोण कोणाकडे? 
- उत्तर महाराष्ट्रातील कृषिमंत्री दादा भुसे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदेंसोबत आहेत. मराठवाड्याचा विचार करता रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही शिंदेंबरोबर आहेत. 
- शिंदे यांच्यासोबत असलेल्या दोन मंत्र्यांपैकी बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे असून अमरावती जिल्ह्यातील आहेत. राज्यमंत्री असलेले अपक्ष राजेंद्र यड्रावकर यांनी केव्हाच शिंदे गट गाठला आहे. माजी मंत्री व कोकणातील मोठे नेते आ. दीपक केसरकर आधीच शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. 
- उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख असे चौघे आता ठाकरे यांच्यासोबत आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे ठाण्याचे म्हणजे मुंबई-कोकण भागातील आहेत. ठाकरे यांच्यासोबत असलेल्या चारपैकी आदित्य व गडाख हे विधानसभा सदस्य आहेत. उद्धव व परब हे परिषदेवर आहेत. 

बालेकिल्ला ढासळला
मुंबई ठाण्यापाठोपाठ मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, पण तेथील दोन्ही मंत्री ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले. विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही, पण आधी वनमंत्री असलेले संजय राठोड हे शिंदे यांच्यासोबत आहेत. विदर्भातील नितीन देशमुख वगळता एकही शिवसेना आमदार आज ठाकरे यांच्यासोबत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हे शिवसेनेचे आमदार आणि आशिष जयस्वाल व नरेंद्र भोंडेकर हे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार देखील शिंंदेंसोबतच आहेत. शिवसेनेच्या १४ मंत्र्यांपैकी ९ म्हणजे ६५ टक्के मंत्री हे शिंदे गटात आहेत. ३५ टक्के मंत्री ठाकरे यांच्यासोबत उरले आहेत.

Web Title: 9 in Shinde's group, only 5 ministers left for Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.