जुगारावर कारावाई करणाऱ्या पाेलिसाच्या डाेक्यात कॅरेट घातले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Published: April 24, 2024 10:21 PM2024-04-24T22:21:38+5:302024-04-24T22:21:49+5:30

दरम्यान, पथकातील पाेलिस कर्मचाऱ्यांच्या डाेक्यात कॅरेट घालत, फरशीने मारहाण केली आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात पाच जणांविराेधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

Carat in police crackdown on gambling; A case has been registered against five persons | जुगारावर कारावाई करणाऱ्या पाेलिसाच्या डाेक्यात कॅरेट घातले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगारावर कारावाई करणाऱ्या पाेलिसाच्या डाेक्यात कॅरेट घातले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर : रेणापुरातील चांदणी चाैकातील जुगारावर चाकूर उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने बुधवारी दुपारी छापा मारला. यावेळी जुगाराचे साहित्य, राेख रक्कम, माेबाईल आणि दुचाकी असा १ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पथकातील पाेलिस कर्मचाऱ्यांच्या डाेक्यात कॅरेट घालत, फरशीने मारहाण केली आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात पाच जणांविराेधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, रेणापूर येथे चांदणी चाैकात एका भाजी सेंटरलगत पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती चाकूर येथील उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने रेणापुरात अचानकपणे छापा मारला. दरम्यान, शासकीय कर्तव्य पार पाडताना त्यांना प्रथम पोलिस असल्याची ओळख करुन दिली. त्यानंतरही अमोल जनार्धन चक्रे याने उजव्या हातावर पेपरवेटने डाव्यापायावर फरशीने मारहाण केली. त्याचबराेबर सोबत असलेले पाेलिस कर्मचारी शिराज शेख यांना रूपेश चक्रे याने उजव्या हातावर कॅरेटने मारहाण केली. बाहेर जाताना कॅरेट डोक्यात घलत, शासकिय कामात अडथळा निर्माण केला. यावेळी रूपेश चक्रे याच्यासह अन्य दाेघेजण घटनास्थळावरुन पसार झाले. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात अमाेल चक्रे, नितीन घाेडके, रुपेश चक्रे याच्यासह अन्य दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Carat in police crackdown on gambling; A case has been registered against five persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.