LokSabha2024: सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान
By संदीप आडनाईक | Published: May 7, 2024 12:19 PM2024-05-07T12:19:48+5:302024-05-07T12:21:19+5:30
कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात पहिल्या चार तासात कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान झाले. कोल्हापूरच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ...
कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात पहिल्या चार तासात कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान झाले. कोल्हापूरच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या तीन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर उत्तर, कागल आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये होती. करवीर मतदारसंघात सर्वाधिक ६९.८७ टक्के मतदान झाले होते. त्या पाठोपाठ कागलमध्ये ६८.२७ टक्के तर चंदगड ६२.४८ टक्के चुरशीने मतदान पार पडत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले. दिवसभर उन्हाचा तडाखा राहणार असल्यामुळे अनेकांनी सकाळीच मतदान करण्याला प्राधान्य दिले असल्याचे सकाळीच लागलेल्या रांगावरुन दिसत होते. सायंकाळपर्यंत हे चित्र कायम असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापुरात दत्ताबाळ हायस्कूल येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला, तर अपर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी छत्रपती शाहू कॉलेज येथे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व युवा वर्गाने आपल्या कुटुंबियांसह मतदान करावे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले आहे.
कोल्हापूर मतदारसंघ सकाळीपर्यंतची आकडेवारी
- चंदगड-- 20.56 टक्के
- कागल- - 23.18 टक्के
- करवीर - 31.95 टक्के
- कोल्हापूर उत्तर - 23.24 टक्के
- कोल्हापूर दक्षिण - 22.55 टक्के
- राधानगरी- 21.49 टक्के
हातकणंगले मतदारसंघ
- हातकणंगले – 24.12 टक्के
- इचलकरंजी – 20.26 टक्के
- इस्लामपूर- 21.70 टक्के
- शाहूवाडी- 17.16 टक्के
- शिराळा- 19.76 टक्के
- शिरोळ - 21.10 टक्के
कोल्हापूर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान
चंदगड- 37.15 टक्के
कागल- 40.03 टक्के
करवीर - 42.12 टक्के
कोल्हापूर उत्तर - 37.85 टक्के
कोल्हापूर दक्षिण - 35.46 टक्के
राधानगरी- 38.18 टक्के
हातकणंगले मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान
हातकणंगले-– 39.65 टक्के
इचलकरंजी – 33.77 टक्के
इस्लामपूर - 37.20 टक्के
शाहूवाडी - 35.48 टक्के
शिराळा - 34.98 टक्के
शिरोळ - 35.71 टक्के
कोल्हापूर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 51.51 टक्के मतदान
चंदगड- 51.45 टक्के
कागल- 54.70 टक्के
करवीर - 56.22 टक्के
कोल्हापूर उत्तर - 49.54 टक्के
कोल्हापूर दक्षिण - 54.62 टक्के
राधानगरी- 51.89 टक्के
हातकणंगले मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 49.94 टक्के मतदान
हातकणंगले-– 53.52 टक्के
इचलकरंजी – 47.00 टक्के
इस्लामपूर - 49.60 टक्के
शाहूवाडी - 52.13 टक्के
शिराळा - 47.42 टक्के
शिरोळ - 49.61 टक्के
कोल्हापूर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 63.71 टक्के मतदान
चंदगड- 62.48 टक्के
कागल- 68.27 टक्के
करवीर - 69.87 टक्के
कोल्हापूर उत्तर - 59.41 टक्के
कोल्हापूर दक्षिण - 60.59 टक्के
राधानगरी- 61.66 टक्के
हातकणंगले मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 62.18 टक्के मतदान
हातकणंगले-– 67.46 टक्के
इचलकरंजी – 59.13 टक्के
इस्लामपूर - 61.90 टक्के
शाहूवाडी - 61.24 टक्के
शिराळा - 59.95 टक्के
शिरोळ - 62.73 टक्के