तीन कृषी कायदे रद्द; कोल्हापुरात पेढे वाटून आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 06:27 PM2021-11-19T18:27:02+5:302021-11-19T18:35:25+5:30
कोल्हापूर : गेली वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात लागू ...
कोल्हापूर : गेली वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे रद्दची घोषणा केली. मोदींनी केलेल्या या घोषणेनंतर देशभरात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर राजकीय वर्तुळात विरोधकांनी यानिर्णयावरुन निवडणुकीचा संदर्भ लावत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
कोल्हापुरात अखिल भारतीय किसन सभा, ए. आय. एस. एफ. व ए. आय. वाय. एफ यांच्या वतीने बिंदू चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तीन कृषी कायद्या विरोधातील हे आंदोलनाची जगाच्या इतिहासात नोंद झाली आहे. कोणी कितीही हुकूमशाही केली तर त्याला शेतकऱ्यांची एकजूट कशी मोडून काढते, हे सिध्द झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आंदोलनाला बळ मिळाले असल्याचे मत यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा या कायद्या मागचा केंद्र सरकारचा उद्देश होता. मात्र यातील जाचक अटीवरुन शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडला होता. या आंदोलन दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले. अखेर शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले.