राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापुरात विजयादशमीचे संचलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 03:24 PM2019-10-08T15:24:23+5:302019-10-08T15:34:32+5:30

भारतीय परंपरेतील वाद्यांचा ताल, अश्वारुढ भगवा ध्वज, आणि शिस्तबद्धपणे चालणारे स्वयंसेवक अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन  शाहूपुरी, बागल चौक परिसरात आज झाले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५००हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.  

Rashtriya Swayamsevak Sangh operates Vijayadasami in Kolhapur | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापुरात विजयादशमीचे संचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापुरात विजयादशमीचे संचलन

Next

कोल्हापुर: भारतीय परंपरेतील वाद्यांचा ताल, अश्वारुढ भगवा ध्वज, आणि शिस्तबद्धपणे चालणारे स्वयंसेवक अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन  शाहूपुरी, बागल चौक परिसरात आज झाले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५००हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.  

संघटित सज्जन शक्तीचे दर्शन समाजाला व्हावे यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. या संचलनात स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होतात. कोल्हापुरातही दरवर्षी दसरा संचलन होते. 

यावर्षी शाहूपुरी आणि बागल चौक परिसरात पथसंचलन झाले. सकाळी सात वाजता शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानात स्वयंसेवक एकत्र आले. शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य नारायण, विभाग संघचालक प्रतापसिंह तथा आप्पासाहेब दड्डीकर, शहर संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. व्ही.टी. पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे आणि ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रार्थना होऊन संचलनास सुरुवात झाली. घोषाच्या तालावर स्वयंसेवकांनी संचलन केले. संचलन मार्गावर चौकाचौकांमध्ये नागरिकांनी संचलनाचे स्वागत करून पुष्पवृष्टी केली. शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावरच संचलनाचा समारोप झाला.

पालकमंत्र्यांची उपस्थिती

संचलनामध्ये पालकमंत्री  चंद्रकांत पाटील पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. तसेच संघ परिवारातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व समाजातील इतर अनेक मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

Web Title: Rashtriya Swayamsevak Sangh operates Vijayadasami in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.