महावितरणच्या नाट्यस्पर्धेत कोल्हापूरच्या 'ती फुलराणी'ची बाजी, 'अग्निपंख'ने मिळवला दुसरा क्रमांक

By संदीप आडनाईक | Published: April 23, 2024 09:53 PM2024-04-23T21:53:48+5:302024-04-23T21:53:59+5:30

  कोल्हापूर : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाच्या 'ती फुलराणी' या नाटकाने मंगळवारी बाजी मारत ...

Kolhapur's 'Ti Phulrani' wins, 'Agnipankh' gets second place in Mahavitaran drama competition | महावितरणच्या नाट्यस्पर्धेत कोल्हापूरच्या 'ती फुलराणी'ची बाजी, 'अग्निपंख'ने मिळवला दुसरा क्रमांक

(छाया : नसीर अत्तार)

 कोल्हापूर : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाच्या 'ती फुलराणी' या नाटकाने मंगळवारी बाजी मारत नाट्यनिर्मितीचे प्रथम क्रमांकाचे आणि पुणे परिमंडलाच्या 'अग्निपंख' या नाटकाने द्वितीय पारितोषिक ‍ मिळवले. कोल्हापूरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दोन दिवशीय नाट्यस्पर्धा पार पडली.

महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मुख्य अभियंता परेश भागवत यांनी विद्युत क्षेत्रात तारेवरची कसरत करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नाट्यकलेचे उच्च दर्जाचे सादरीकरण झाल्याबद्दल कौतुक केले. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार, नाट्यपरीक्षक संजय दिवाण, उज्ज्वला खांडेकर, महेश गोटखिंडीकर उपस्थित होते. अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी प्रास्तविक केले. अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी आभार मानले. मुकुंद अंबी यांनी सूत्रसंचालन केले.

निकाल सविस्तर असा व्यक्तिगत गट अभिनय (पुरुष) - प्रथम- प्रसाद दिवाण (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय- मंगेश कांबळे ( ती फुलराणी, कोल्हापूर),अभिनय (स्त्री) - प्रथम- श्वेता सांगलीकर( ती फुलराणी, कोल्हापूर), व्दितीय -अपर्णा मानकीकर ( अग्निपंख, पुणे), अभिनय उत्तेजनार्थ- पौर्णिमा पुरोहीत ( ती फुलराणी, कोल्हापूर), संतोष गहेरवार (अग्निपंख, पुणे), रामचंद्र चव्हाण (विठू माझा लेकुरवाळा), दिग्दर्शन- प्रथम - श्रीकांत सणगर (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय – अरविंद बुलबुले ( अग्निपंख, पुणे), नेपथ्य- प्रथम - नितीन सावर्डेकर, शिवराज आणेकर (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय – राहूल यादव, किशोर अहिवळे, मयुर गंधारे (अग्निपंख, पुणे), प्रकाशयोजना- प्रथम -शकील महात, गिरीष भोसले (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय -धनराज बिक्कड, संदीप कांबळे, कुमार गवळी (अग्निपंख, पुणे ),पार्श्वसंगीत- प्रथम - संगिता कुसुरकर, विनायक पाटील (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय –राजेंद्र हवालदार, विजय जाधव (अग्निपंख, पुणे),रंगभूषा व वेशभूषा- प्रथम -शुभांगी निंबाळकर, निकिता बोरसे, आशा पाटील (अग्निपंख, पुणे), द्वितीय–नजीर मुजावर, बजरंग पवार, रश्मी पाटील, स्मिता हातकर (ती फुलराणी, कोल्हापूर) फोटो : २३०४२०२४-कोल-ती फुलराणी फोटो ओळी : कोल्हापूरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडलेल्या दोन दिवशीय नाट्यस्पर्धेत मंगळवारी कोल्हापूर केंद्राच्या ती फुलराणी नाटकातील कलाकारांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते स्वीकारले.

Web Title: Kolhapur's 'Ti Phulrani' wins, 'Agnipankh' gets second place in Mahavitaran drama competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.