शशिकांत शिंदेंबाबत भाजपकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार 

By पोपट केशव पवार | Published: May 2, 2024 12:02 PM2024-05-02T12:02:36+5:302024-05-02T12:03:27+5:30

कोल्हापूर : केंद्र सरकारने अरविंद केजरीवाल, झारखंडमध्ये सोरेन यांच्यावर सत्तेचा गैरवापर करुन ज्या प्रकारे खोट्या केसेस केल्या. त्याचपध्दतीने ते ...

Abuse of power by BJP regarding Shashikant Shinde says Sharad Pawar | शशिकांत शिंदेंबाबत भाजपकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार 

शशिकांत शिंदेंबाबत भाजपकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार 

कोल्हापूर : केंद्र सरकारने अरविंद केजरीवाल, झारखंडमध्ये सोरेन यांच्यावर सत्तेचा गैरवापर करुन ज्या प्रकारे खोट्या केसेस केल्या. त्याचपध्दतीने ते सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रकरणात अडकवून सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

पवार म्हणाले, शिंदे यांचे प्रकरण कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित आहे. येथे निवडून आलेल्या संचालकांच्या हातात प्रशासन असते. कामगारांच्या प्रतिनिधींच्या हातात नसते. मात्र, काहीतरी काढून खोट्या केसेस करायच्या हे घडत आहे. शिंदे यांच्याबाबतीत सत्तेचा पूर्णपणे गैरवापर होतोय हे याचे उत्तम उदाहरण आहे.

२००९ चे प्रकरण 

कोरेगावमधील आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी आरोप केले. एपीएमसी मध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे ६५ कोटींचे नुकसान केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. तर शिंदे यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविला होता. हे प्रकरण २००९ चे आहे.

Web Title: Abuse of power by BJP regarding Shashikant Shinde says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.