हॉटेलमधून बाहेर पडताना धक्का लागल्याने कोल्हापुरात तरुणास बेदम मारहाण

By उद्धव गोडसे | Published: May 15, 2024 12:01 PM2024-05-15T12:01:16+5:302024-05-15T12:01:48+5:30

कोल्हापूर : हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर पडताना धक्का लागल्याने अमित अशोक सोनुले (वय ३३, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर ) ...

A young man was brutally beaten in Kolhapur after being shocked while leaving the hotel | हॉटेलमधून बाहेर पडताना धक्का लागल्याने कोल्हापुरात तरुणास बेदम मारहाण

हॉटेलमधून बाहेर पडताना धक्का लागल्याने कोल्हापुरात तरुणास बेदम मारहाण

कोल्हापूर : हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर पडताना धक्का लागल्याने अमित अशोक सोनुले (वय ३३, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर) याला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. १२) रात्री बाराच्या सुमारास पुईखडी येथील एका हॉटेलबाहेर घडला.

याबाबत सोनुले याने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी रवींद्र दिलीप जोशी (रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर), विक्रम प्रकाश पाटील (रा. पडसाळी, ता. राधानगरी) आणि प्रदीप प्रकाश खुपले (रा. फुलेवाडी, कोल्हापूर) या तिघांसह अनोळखी चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला. 

फिर्यादी अमित सोनुले हा पुईखडी येथील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. जेवण करून बाहेर येताना त्याचा विक्रम पाटील याला धक्का लागला. चुकून धक्का लागल्यामुळे स्वारी म्हणत त्याने पाटील याची माफी मागितली. मात्र, शिवी दिल्याच्या गैरसमजातून पाटील याच्यासह सात ते आठ जणांनी सोनुले याला मारहाण केली. झटापटीत सोनुले याचा मोबाइल फुटून नुकसान झाले.

Web Title: A young man was brutally beaten in Kolhapur after being shocked while leaving the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.