शिवराज्याभिषेक सोहळाच्या पूर्वनियोजनासाठी येत्या रविवारी पुण्यात राज्यव्यापी बैठक

By विश्वास पाटील | Published: May 17, 2024 06:02 PM2024-05-17T18:02:09+5:302024-05-17T18:03:21+5:30

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश-परदेशांतून शिवभक्त सोहळ्यास हजेरी लावणार

A state-wide meeting will be held in Pune on Sunday for the pre planning of the Shiva Rajabhishek ceremony | शिवराज्याभिषेक सोहळाच्या पूर्वनियोजनासाठी येत्या रविवारी पुण्यात राज्यव्यापी बैठक

शिवराज्याभिषेक सोहळाच्या पूर्वनियोजनासाठी येत्या रविवारी पुण्यात राज्यव्यापी बैठक

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त पूर्वनियोजनासाठी रविवारी (ता. १९) राज्यव्यापी बैठक होत आहे. पुणे येथील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे सायंकाळी ५ वाजता बैठकीस सुरुवात होईल.

समितीचे मार्गदर्शक माजी खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत असून, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सोहळा दिमाखात साजरा केला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश-परदेशांतून शिवभक्त सोहळ्यास हजेरी लावणार आहेत.

शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी, लेझीम, ढोल-ताशा, धनगरी ढोल, पालखी सोहळा आकर्षण असणार आहेत. एकूणच या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शिवभक्तांच्या सूचना मागविण्यात येत आहेत. तरी या बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: A state-wide meeting will be held in Pune on Sunday for the pre planning of the Shiva Rajabhishek ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.