भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! कल्याणमध्ये सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 07:33 PM2024-04-16T19:33:51+5:302024-04-16T19:59:59+5:30

आज कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा प्रचार सुरू झाला. आज खासदार संजय राऊत यांनीही उपस्थिती लावली होती.

lok sabha election 2024 Sulabha Gaikwad attended the campaign of Thackeray group candidate Vaishali Darekar | भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! कल्याणमध्ये सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग

भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! कल्याणमध्ये सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिला आहे. दरेकर या ठाकरे गटाच्या नेत्या आहेत. तर महायुतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे, यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात भाजपा आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी खासदार शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचा ठराव केला होता. दरम्यान, आज ठाकरे गटाच्या प्रचारात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी  सुलभा गायकवाड वैशाली दरेकर यांच्यासोबत दिसल्या आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. 

...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत कल्याण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी संजय राऊत व दरेकर यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांच्या प्रचार गायकवाड करत आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

याआधी कल्याण मधील नववर्ष स्वागत यात्रेत वैशाली दरेकर यांची भेट घेत सुलभा गायकवाड यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता चक्क दरेकर यांच्या प्रचारातच सुलभा गायकवाड त्यांच्या सोबत दिसल्याने गायकवाड यांनी दरेकर यांच्या सारथी झाल्याचे पहायला मिळाले आहे. यामुळे महायुती उमेदवाराच्या विरोधात असलेल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड प्रचार करत आहेत का, अशा चर्चा सुरू आहेत.

प्रचार करणार नसल्याचा ठराव गायकवाड समर्थकांनी केला होता 

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. या गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे ते सध्या तळोजा कारागृहात आहेत. दरम्यान भाजप आमदार गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांचे काम करणार नाही. कल्याण लोकसभेतून भाजपला उमेदवारी द्यावी असा ठराव केला. त्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना करावा लागला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकारी वर्गाची बैठक घेऊन कल्याण पूर्वेतील वाद संपला असल्याचे म्हटले हाेते.

वाद संपुष्टात आला असल्याचे सांगितले जात असले तरी नववर्ष स्वागत यात्रेत गुढी पा्डव्याला भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांची गळाभेट घेऊन त्यांना नववर्षाच्या सुभेच्छा दिल्या होत्या. शुभेच्छा कोणी कोणाला देऊ शकतो अशी सारवासारव आमदार गायकवाड गटाकडून केली गेली. आज पुन्हा गोरपे गावात आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राऊत यांच्या स्वागत मिरवणूकीत सहभागी झाल्याने या कल्याण पूर्वेतील शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद संपुष्टात आलेला नाही हेच अधोरेखीत झाले.

Web Title: lok sabha election 2024 Sulabha Gaikwad attended the campaign of Thackeray group candidate Vaishali Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.