लग्नाच्या 12 दिवसांनीही चेहरा दाखवत नव्हती पत्नी, झाला असा खुलासा व्यक्तीला बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:15 AM2024-05-10T11:15:38+5:302024-05-10T11:22:27+5:30

26 वर्षीय उद्योगपतीने स्वत:च आपल्या एक नवरी शोधली होती. सोशल मीडियावर दोघांची भेट झाली होती.

Indonesian Man shocked to learn that his newly wed wife is actually a man | लग्नाच्या 12 दिवसांनीही चेहरा दाखवत नव्हती पत्नी, झाला असा खुलासा व्यक्तीला बसला धक्का!

लग्नाच्या 12 दिवसांनीही चेहरा दाखवत नव्हती पत्नी, झाला असा खुलासा व्यक्तीला बसला धक्का!

लग्नाबाबत प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्ने असतात. एक सुंदर मुलगी मिळावी आणि तिच्यासोबत आनंदाने संसार करावा असं सगळयांना वाटत असतं. बरेच लोक आपल्या ईच्छेनुसार लग्न करतात, पण नंतर त्यांना पश्चाताप होतो. कारण त्यांच्यासोबत भलतंच काहीतरी घडलेलं असतं. 

इंडोनेशियामधील एका उद्योगपतीने मोठ्या धडाक्यात लग्न केलं. पण त्याला जराही अंदाज नव्हता की, पुढे काय होणार आहे. ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय उद्योगपतीने स्वत:च आपल्या एक नवरी शोधली होती. सोशल मीडियावर दोघांची भेट झाली होती. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. शाही थाटात लग्न पार पडलं. पण नवी नवरी घरी येताच एक भानगड झाली.

सोशल मीडियावर भेट झाल्यावर व्यक्ती मुलीच्या प्रेमात पडला. त्याचं बोलणं होत होतं. त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. मुलीने तिचं नाव अदिंदा खांज़ा अज़ाहरा असं सांगितलं होतं आणि ती नेहमी हिजाब घालूनच राहत होती. व्यक्तीला तिची ही गोष्ट आवडली आणि त्याला ती फार लाजाळू वाटत होती. पण लग्नाच्या 12 दिवसांनी सुद्धा ती पतीपासून चेहरा लपवत होती. 

लग्नानंतर आपल्या पत्नीचं असं वागणं पाहून व्यक्ती हैराण झाला आणि त्याने चौकशी केली. तेव्हा त्याला समजलं की, नवरी समजून तो जिला घरी घेऊन आला तो मुलगा आहे. तो त्याला फसवत होता. शेवटी व्यक्ती परिवारातील लोकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. आता त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Indonesian Man shocked to learn that his newly wed wife is actually a man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.