'तू खूप हॅंडसम आहेस...', म्हणत महिला तरूणाच्या पडली गळ्यात, टॉयलेटमध्ये लपण्याची आली वेळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 01:37 PM2024-04-23T13:37:42+5:302024-04-23T13:38:52+5:30

तो बसची वाट बघत उभा होता. तेव्हा मागून एक महिला आली आणि तिने त्याला मिठी मारली.

China man harassed by woman who called him handsome chased hugged him forcely | 'तू खूप हॅंडसम आहेस...', म्हणत महिला तरूणाच्या पडली गळ्यात, टॉयलेटमध्ये लपण्याची आली वेळ...

'तू खूप हॅंडसम आहेस...', म्हणत महिला तरूणाच्या पडली गळ्यात, टॉयलेटमध्ये लपण्याची आली वेळ...

एका तरूणाने त्याच्यासोबत घडलेली एक अजब घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. तो म्हणाला की, त्याला एका महिलेने इतका त्रास दिला की, त्याला पळून जावं लागलं. ही महिला भर रस्त्यात त्याचा पाठलाग करत होती आणि रस्त्यातच त्याला मिठीही मारत होती.

अशात त्याला पोलिसांना फोन करावा लागला. या व्यक्तीचं नाव यिजाई आहे. त्याने सांगितलं की, तो बसची वाट बघत उभा होता. तेव्हा मागून एक महिला आली आणि तिने त्याला मिठी मारली. याचा त्याने लगेच व्हिडीओ बनवला. यात तो महिलेला दूर करताना दिसत आहे. नंतर तो पळून जातो. महिला तरीही त्याचा पाठलाग करते.

महिला जोरजोरात ओरडून म्हणते की, 'तू खूप हॅंडसम आहेस'. यावर तरूण म्हणतो की, माझ्यापासून दूर रहा. मला त्रास देऊ नको. मी पोलिसांना फोन करेन. तुला हे सगळं करताना लाज कशी वाटत नाहीये. यावर महिला म्हणते की, पोलिसांना नको बोलवूस. पण ती काही त्याचा पाठलाग सोडत नाही. यिजाई एका बसमध्ये चढतो. त्याच बसमध्ये महिलाही चढते आणि बसमध्येही त्याला त्रास देते. यिजाई तिला म्हणतो की, ताई, आपण एकमेकांना ओळखत नाही. माझ्या जवळ येऊ नको.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या बीजिंगमधील आहे. यिजाई बसमधून उतरल्यावरही महिला त्याचा पाठलाग करते. तो नंतर एका पुरूषांच्या टॉयलेटमध्ये लपतो. तिथून बाहेर येऊन एका रेस्टॉरंटमध्ये लपतो. त्याने हेही सांगितलं की, त्याने महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. असं वाटतं की, ती मानसिक आजारी आहे आणि इतर पुरूषांसोबत असंच करते. 

त्याच्या पोस्टवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, तरूणांनीही घराबाहेर जाताना आपली सुरक्षा करणं शिकलं पाहिजे. दुसऱ्याने लिहिलं की, मलाही अशा एका घटनेचा सामना करावा लागला होता. महिला माझा पाठलाग करत राहिली. मी फार घाबरलो होतो.  

Web Title: China man harassed by woman who called him handsome chased hugged him forcely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.