विक्रीकर वसुलीसाठी जीएसटीकडून जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:38 AM2019-10-16T00:38:58+5:302019-10-16T00:40:10+5:30

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायद्याखाली व्यापा-याच्या जंगम मालमत्तेची जप्ती करण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.

Seizure from GST for sales tax collection | विक्रीकर वसुलीसाठी जीएसटीकडून जप्ती

विक्रीकर वसुलीसाठी जीएसटीकडून जप्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील कादराबाद येथील हॉटेल व्यावसायिकाकडे ९ लाख रुपयांची विक्रीकर थकबाकी होती. अनेक वेळा नोटीस देऊनही सदरील व्यापाऱ्याने गांभीर्याने न घेतल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायद्याखाली व्यापा-याच्या जंगम मालमत्तेची जप्ती करण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.
ही कारवाई सहायक राज्यकर आयुक्त नारायण चोरमले यांच्यासह त्यांच्या पथकातील राज्य कर अधिकारी जोशी, राज्य कर अधिकारी टारफे, कर निरीक्षक वाव्हळे, कर निरीक्षक नागरे, कर सहायक रणजित गुनावत, लगड, मुठ्ठे, आटकर आदींनी केली.
या कारवाईमध्ये व्यापा-या कडील दारूचा साठा जप्त करण्यात आला. यानंतर व्यापा-याने १० नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरण्याचे मान्य केले. सदरील थकबाकी न भरल्यास जप्त मालाचा लिलाव करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कार्यवाही राज्यकर उपायुक्त संतोष श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिका-यांनी यशस्वी केली. जीएसटी विभागाच्या कार्यवाहीमुळे शहरातील व्यापा-यांमध्ये मोठी खळबळ उडाली. या कारवाईमुळे शहरातील इतर थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरावी अन्यथा त्यांच्यावरही अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्यकर उपायुक्त संतोष श्रीवास्तव यांनी दिला आहे.

Web Title: Seizure from GST for sales tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.