मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार
By विजय मुंडे | Published: February 26, 2024 03:31 PM2024-02-26T15:31:45+5:302024-02-26T15:32:28+5:30
राज्यात शांततेत आंदोलन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका: मनोज जरांगे
जालना : समाज बांधवांच्या मागणीनुसार १७ व्या दिवशी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. संचारबंदीमुळे नागरिकांना अंतरवाली सराटीत येता येत नाही. त्यामुळे मी राज्यातील गावा-गावात जावून समाज बांधवांशी संवाद साधणार आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
रात्री पाच हजार महिला, २५ हजार लोकं होती. रात्रीच त्यांना काही तरी घडवून आणायचे होते. पोलिस आणि मराठ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली असती तर दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी घडली असती. रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता तर राज्यातील मराठा पेटून उठला असता. पहिला हल्ला फडणवीस यांनी केला आहे. आताही त्यांचाच डाव आहे. जशास तसे उत्तर येतायत म्हणून आणखी केसेस मागे घेतल्या नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेवू नये. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी. तुम्ही चक्रव्यूह रचले होते. तुमची इच्छा होती राज्यात दंगल घडण्याची. परंतु, आम्ही तो डाव उधळून लावला आहे, असेही जरांगे म्हणाले.