लाकडी दांडक्याचा धाव वर्मी लागला; पुतण्यानेच मामाच्या मदतीने चुलतीचा केला खून

By दिपक ढोले  | Published: June 20, 2023 08:30 PM2023-06-20T20:30:39+5:302023-06-20T20:30:48+5:30

दोन्ही संशयित फरार असून पोलीस पुढील तपास करत करत आहेत

In Jalana It was the nephew killed aunty with the help of his uncle | लाकडी दांडक्याचा धाव वर्मी लागला; पुतण्यानेच मामाच्या मदतीने चुलतीचा केला खून

लाकडी दांडक्याचा धाव वर्मी लागला; पुतण्यानेच मामाच्या मदतीने चुलतीचा केला खून

googlenewsNext

परतूर : पुतण्यानेच मामाच्या मदतीने लाकडी दांड्याने मारहाण करून चुलतीचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील आंबा येथे मंगळवारी उघडकीस आली. मंगलबाई सुखदेव जाधव (४५) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सुखदेव जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित कैलास भुगाजी जाधव (रा. आंबा, ता. परतूर) व त्याचा मामा बंडू (पूर्ण नाव माहीत नाही) या संशयितांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबा येथील गवळी गल्लीत राहणारे सुखदेव माणिक जाधव यांचा दूध व दहीविक्रीचा व्यवसाय आहे. या कामात त्यांची पत्नी मंगल जाधव या पतीला मदत करतात. मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुखदेव म्हशीचे दूध काढत असताना त्यांचा पुतण्या कैलास उर्फ पिंट्या मुगाजी जाधव याने घरी येऊन सुखदेव यांना शिवीगाळ केली. तेव्हा गावातील काही लोकांनी वाद मिटविला. नंतर सुखदेव व त्यांची पत्नी मंगल हे दोघे नेहमीप्रमाणे परतूर येथे दूध, दही विक्री करण्यासाठी गेले. सुखदेव हे आंबा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या मुलीस घेऊन ११ वाजेच्या सुमारास घरी परतले. 

तेव्हा पुतण्या कैलास जाधव व त्याचा मामा बंडू (पूर्ण नाव नाही) हे घरी आले. बंडू याने माझ्या भाच्यास शिवीगाळ का केली, असे म्हणत दोघांनी सुखदेव यांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या सुखदेव यांनी त्यांच्यापासून कशीबशी सुटका करत काही अंतरावर असलेल्या तळ्याकडे धाव घेतली. दरम्यान, ११:३० वाजेच्या सुमारास सुखदेव यांची पत्नी मंगल जाधव या परतूरहून दूध, दही विक्री करून परत घराकडे येत होत्या. 

आंबा येथील तळ्याजवळ कैलास जाधव व बंडू या दोघांनी मंगलबाई यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने मंगलबाई यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. या प्रकरणी सुखदेव जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित कैलास मुगाजी जाधव व त्याचा मामा बंडू (पूर्ण नाव नाही) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित फरार असून, पुढील तपास उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.

Web Title: In Jalana It was the nephew killed aunty with the help of his uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.