६ कोटी खर्चून अन्नअमृतचा आहार प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:42 AM2019-10-16T00:42:49+5:302019-10-16T00:43:36+5:30
इस्कॉन या संस्थेचा एक भाग असलेल्या अन्नअमृत या संस्थेकडून जालन्यात अद्यायावत अन्न तयार करण्यासाठीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : इस्कॉन या संस्थेचा एक भाग असलेल्या अन्नअमृत या संस्थेकडून जालन्यात अद्यायावत अन्न तयार करण्यासाठीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी जालन्यातील उद्योजकांकडून याला मोठी मदत मिळत आहे. गोल्डल ज्युबिली शाळेच्या एक एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जागतिक अन्न पुरस्कार विजेते स्व. बद्रीनारायण बारवाले यांच्या परिवाराकडून या प्रकल्पासाठी भरीव मदत झाल्याने या प्रकल्पाला जालन्यात गती आली आहे. यासासाठी अंदाजे सहा कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्रकल्प उभारणीसाठी परिश्रम घेत असलेल्य सामाजिक कार्यर्त्या अनया अग्रवाल यांच्यासह या संस्थेचे मराठवाडा विभागाचे समन्वयक सुदर्शन पोटभरे, गणेश नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोटभरे म्हणाले की, शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेवरच हा प्रकल्प आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे या हेतून अन्नअमृत फाऊंडेशनकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. औरंगाबादेत गेल्या पाच वर्षापासून या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार पुरविला जात आहे. जालन्यातील सात शाळांमध्ये या संस्थेकडून ६ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे.