भारतीय आय ड्रॉप्सने अमेरिकेत संसर्ग? ५५ जणांना बाधा, ११ अंध, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 07:10 AM2023-02-05T07:10:52+5:302023-02-05T07:11:58+5:30

इझरी केअर आर्टिफिशियल टीअर्स असे या आय ड्रॉप्सचे नाव असून, चेन्नई येथील ग्लोबल फार्मा हेल्थकेअर या औषधनिर्माण कंपनीने ते बनवले आहे. दरम्यान, या औषधाचे उत्पादन त्वरित थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

Indian eye drops infected in America 55 disabled, 11 blind, 1 dead | भारतीय आय ड्रॉप्सने अमेरिकेत संसर्ग? ५५ जणांना बाधा, ११ अंध, एकाचा मृत्यू

भारतीय आय ड्रॉप्सने अमेरिकेत संसर्ग? ५५ जणांना बाधा, ११ अंध, एकाचा मृत्यू

googlenewsNext

कॅलिफोर्निया :भारतीय औषध कंपनीने बनविलेल्या आय ड्रॉप्समुळे अमेरिकेत संसर्ग पसरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत ५५ जणांना फटका बसला असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अमेरिकन बाजारातून आपले आय ड्रॉप्स कंपनीने परत मागवले आहेत. काही दिवसांपूर्वी यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) अमेरिकींना या औषधाचा वापर तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले होते. 

इझरी केअर आर्टिफिशियल टीअर्स असे या आय ड्रॉप्सचे नाव असून, चेन्नई येथील ग्लोबल फार्मा हेल्थकेअर या औषधनिर्माण कंपनीने ते बनवले आहे. दरम्यान, या औषधाचे उत्पादन त्वरित थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

औषधाने अंधत्व, मृत्यूचा धोका
हे आय ड्रॉप कोणत्या तरी जिवाणूने दूषित असल्याचा संशय आहे. लोकांनी त्याचा वापर थांबवावा. संक्रमण जीवघेणे ठरू शकते, असे अमेरिकेच्या फूड अँड ड्रग असोसिएशनने (एफडीए) म्हटले आहे.

१२ राज्यांतील ५५ जणांना संसर्ग
या आय ड्रॉप्सच्या वापरामुळे अमेरिकेतील १२ राज्यांत स्युडोमोनास एरुगिनोसा नावाच्या जिवाणूचा संसर्ग पसरत आहे. हा जिवाणू मानवी रक्त, फुप्फुस व इतर अवयवांना संक्रमित करतो. आतापर्यंत ५५ जणांना याची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे, तसेच ११ जणांची दृष्टी गेली आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, आजच्या काळात स्युडोमोनास एरुगिनोसाचा संसर्ग बरा करणे खूप कठीण आहे. कारण हा जिवाणू पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक झाला आहे.

कंपनीवर छापा 
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोलरने चेन्नईस्थित ग्लोबल फार्मा हेल्थकेअरवर छापा टाकला. ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने म्हटले आहे की, या उत्पादनाच्या वितरकांना विनंती करत आहोत की, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक ज्यांच्याकडे परत मागवलेले उत्पादन आहे, त्यांनी ते वापरणे थांबवावे.
 

Web Title: Indian eye drops infected in America 55 disabled, 11 blind, 1 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.