अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:38 AM2024-04-18T10:38:00+5:302024-04-18T10:39:01+5:30

New York Cyber attack हल्ला झाल्यानंतर विधेयकाचा मसुदा तयार करण्याची यंत्रणा ठप्प झाल्याची अधिकाऱ्याने दिली माहिती

Cyberattack hits New York state government bill drafting office | अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला

अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला

Cyber attack on New York state government bill drafting office: अमेरिकेची राजधानी असलेल्या न्यूयॉर्क मध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीची लगबग सुरू आहे. राज्य कार्यालय आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय बिलांना अंतिम रूप देण्याच्या मानसिकतेत आहे. पण अशातच बुधवारी स्टेट ड्राफ्टिंग बिल कार्यालयावर सायबर हल्ला झाला. या हल्ल्याची व्याप्ती अद्याप स्पष्ट झालेली नाही, परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की, विधेयकाचा मसुदा तयार करण्याची यंत्रणा बुधवारी सकाळपासूनच ठप्प झाली. या हल्ल्यामुळे कामावर परिणाम झाल्याचे गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी मान्य केले. हे कार्यालय अल्बानीमधील स्टेट कॅपिटलमध्ये कायद्यांची छपाई करण्याचे काम करते.

“या क्षणी आम्हाला असे दिसत आहे की या हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी थोडा अधिक वेळ लागेल, कारण संगणकामध्ये भरपूर डेटा गुंतलेला आहे. सायबर हल्ला झाल्यामुळे आता कदाचित आम्हाला 1994 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या सिस्टमचा वापर करून काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील", अशी माहिती हॉच्युल WNYC वर मुलाखतीत दिली. तसेच, हा हल्ला राजकीयदृष्ट्या प्रेरित हल्ला आहे का असे विचारले असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.

एका निवेदनात, राज्य सिनेटचे नेते माईक मर्फी यांचे प्रवक्ते म्हणाले की, स्टेट ड्राफ्टिंग बिल कार्यालय अजूनही चेंबर्सच्या कामावर प्रक्रिया सुरु ठेवू शकेल. आम्हाला असे वाटत नाही की यामुळे हल्ल्यामुळे एकूण प्रक्रियेस विलंब होईल.

सायबर सुरक्षा अधिकारी तैनात

अर्थसंकल्पाची प्रक्रिया सुरूच आहे आणि आम्ही सर्व न्यूयॉर्कवासीयांच्या गरजा पूर्ण करणारे बजेट वितरीत करण्यासाठी विधानमंडळासोबत काम करत राहू. विधानमंडळाला मदत करण्यासाठी आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सायबरसुरक्षा अधिकाऱ्यांना तात्काळ तैनात करण्यात आल्याचे हॉचुल यांच्या प्रवक्त्याने सांगितले

Web Title: Cyberattack hits New York state government bill drafting office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.