“भारतात परिस्थिती ठीक नाही, भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न,” केम्ब्रिजमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 10:52 AM2022-05-21T10:52:19+5:302022-05-21T10:52:50+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठात आयडियाज फॉर इंडिया या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

congress rahul gandhi fighting to regain india bjp stifling voices india conference cambridge university in london | “भारतात परिस्थिती ठीक नाही, भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न,” केम्ब्रिजमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

“भारतात परिस्थिती ठीक नाही, भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न,” केम्ब्रिजमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

googlenewsNext

आयडियाज फॉर इंडिया परिषदेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसला पूर्वीसारखा भारत मिळवायचा आहे. त्यासाठी आम्ही लढतोय. तर भाजप आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. तसंच चीन बाबत बोलतानाही राहुल गांधी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

“पूर्वीसारखा भारत परत मिळवण्यासाठी आमचा पक्ष लढत आहे. परंतु भाजपकडून लोकांचा आवाज दाबला जातो. आम्ही लोकांचा आवाज ऐकण्यासाठी काम करत आहोत,” असं राहुल गांधी म्हणाले. ज्यांनी देशाच्या निर्मितीचं काम केलं, त्या संस्थांवर हल्ले होत आहेत, त्यावर डीप स्टेटचा कब्जा असल्याचंही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यासोबत सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोइत्रा आणि मनोज झा यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. 

अंतर्गत कलहाचा सामना - राहुल गांधी
“काँग्रेसची ही लढाई आता वैचारिक लढाई आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे. भाजप आणि संघाला भारत एक भूगोलाप्रमाणे दिसत आहे. परंतु काँग्रेससाठी भारत हा लोकांनी बनतो,” असं ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसला अंतर्गत कलह, पक्ष बदल आणि निवडणूकांमध्ये पराभव अशा गोष्टांना सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी मान्य केलं.

“ध्रुवीकरणामुळे सत्तेत”
“भाजप सरकारच्या काळात रोजगार कमी झाले आहेत. असं असूनही ध्रुवीकरणामुळे ते सत्तेत राहिलेत. आज भारतात परिस्थिती चांगली नाही. भाजपने चहुबाजूंना रॉकेल शिंपडले आहे,” असंही राहुल गांधी म्हणाले. आमच्याकडे एक असा भारत आहे, जेथे निरनिराळे विचार मांडता येतील आणि आपण चर्चाही करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

“प्रत्येक संस्थांवर सरकारचा कब्जा झाला आह. प्रत्येक संस्थांवर हल्ला केला जात आहे. आमच्याकडे भाजपसारखा उमेदवार आहे असं लोक म्हणतात. जर आपण भाजपसारखा उमेदवार आहे असं म्हटलं तर आपण भाजपच होऊ. भाजप आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सर्वांचा आवाज ऐकतो. आम्ही लोकांना ऐकण्यासाठई आहोत,” असं लोकशाही विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले.

Web Title: congress rahul gandhi fighting to regain india bjp stifling voices india conference cambridge university in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.