पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:46 PM2024-05-03T18:46:50+5:302024-05-03T18:49:12+5:30

China Chang e6 mission : यासंदर्भात चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, चांग'ई-6 मिशनला चंद्रावरील दूरवरच्या रहस्यमय भागातील सॅम्पल एकत्रित करून पुन्हा पृथ्वीवर परतण्याचे काम देण्यात आले आहे.

china chang e 6 mission launches Pakistan went to copy India, launched 'Moon Mission' with China's help | पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

चीनने शुक्रवारी आपले मून रिसर्च मिशन चांग'ई-6 यान लॉन्च केले. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 05:27 वाजता हे यान लॉन्च करण्यात आले. यासंदर्भात चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, चांग'ई-6 मिशनला चंद्रावरील दूरवरच्या रहस्यमय भागातील सॅम्पल एकत्रित करून पुन्हा पृथ्वीवर परतण्याचे काम देण्यात आले आहे. 

महत्वाचे म्हणजे, चिनच्या या यानासोबतच पाकिस्ताननेही आपला उपग्रह पाठवला आहे. मात्र, पाकिस्तानचीनच्या मदतीने भारताची कॉपी करू इच्छित असला तरी, त्याच्या सोबत एक खेला झाला आहे. खरे तर, आर्थिक संकटात सापडलेले पाकिस्तानी नागरीकच पाकिस्तानच्या या मोहिमेविरोध बोलू लागले आहेत. आम्हाला आधी भाकरी हवी आहे, मून मिशनने काय होणार? असा प्रश्न हो नागरिक सोशल मीडियावर विचारत आहेत.

सीएनएसए ने दिलेल्या महितीनुसार, लॉन्ग मार्च-5 वाय-8 रॉकेट, चांग'ई-6 ला घेऊन गेले आहे. चांग'ई-6 अंतराळयानात एक ऑर्बिटर, एक लँडर, एक आरोही आणि एका रिटर्नरचा समावेश आहे. या यानावर आंतरराष्ट्रीय सहकार्याने विकसित 4 पेलोड आहेत. फ्रान्स, इटली आणि यूरोपीय अंतराळ संस्थांचे वैज्ञानिक उपकरण चांग'ई-6 लँडरवर आहे. तसेच पाकिस्तानचा एक छोटा उपग्रह ऑर्बिटरवर आहे.

असा आहे चांग'ई-6 चा उद्देश -  
अपोलो बेसिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्पॅक्ट क्रेटरची चांगई-6 मिशनसाठी प्राथमिक लक्ष्य लँडिंग आणि सॅम्पलिंग साइट म्हणून निवड करण्यात आली आहे. जे दक्षिण ध्रुव-एटकेन बेसिनमध्ये आहे. हे यान चंद्रावर सॉफ्ट लॅडिंग करेल. लँडिंगनंतर 48 तासांच्या आत चंद्राच्या पृष्ठभागावरील खडक आणि माती काढण्यासाठी रोबोटिक हातांचा वापर केला जाईल, तर पृष्ठ भाग फोडण्यासाठी ड्रिलचा वापर केला जाईल. नंतर, नमुने कंटेनरमध्ये सील केले जातील आणि आरोही चंद्रावरून उडेल आणि चंद्राच्या कक्षेत ऑर्बिटरसह डॉक करेल. हे संपूर्ण मिशण साधारणपणे 53 दिवस चालण्याची शक्यता आहे, असेही सीएनएसएने म्हटले आहे.

Web Title: china chang e 6 mission launches Pakistan went to copy India, launched 'Moon Mission' with China's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.