‘संपूर्ण स्वच्छता’ला १७ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:48 AM2018-08-29T00:48:42+5:302018-08-29T00:49:14+5:30

जि.प.च्या संपूर्ण स्वच्छता अभियानात गतवर्षी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. मात्र त्यातील जवळपास ४१ हजार १९४ शौचालयांच्या बांधकामाचे प्रोत्साहन अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळाले नाही. रखडलेल्या ४९.३९ कोटींपैकी केवळ १७ कोटी मिळाले असून ते फोटो अपलोडिंग केलेल्या पंचायत समित्यांना प्राधान्याने वितरित केले जाणार आहेत.

 'Total cleanliness' receives 17 crores | ‘संपूर्ण स्वच्छता’ला १७ कोटी प्राप्त

‘संपूर्ण स्वच्छता’ला १७ कोटी प्राप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जि.प.च्या संपूर्ण स्वच्छता अभियानात गतवर्षी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. मात्र त्यातील जवळपास ४१ हजार १९४ शौचालयांच्या बांधकामाचे प्रोत्साहन अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळाले नाही. रखडलेल्या ४९.३९ कोटींपैकी केवळ १७ कोटी मिळाले असून ते फोटो अपलोडिंग केलेल्या पंचायत समित्यांना प्राधान्याने वितरित केले जाणार आहेत.
या योजनेसाठी राज्य व केंद्र शासन निधी देते. केंद्र शासनाकडूनच हे १७ कोटी मिळाले आहेत. तर राज्य शासनाचा वाटा मिळणे बाकी आहे. केंद्राकडून अजूनही जवळपास १७ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. तर राज्य शासनाची डीपीसीतून ७ कोटी तर समाजकल्याणमार्फत ४ कोटी रुपये देण्याची तयारी सुरू आहे. मात्र या दोन्ही बाबींचे प्रस्ताव अजून अंतिम टप्प्यातच आहेत.
हिंगोली जिल्ह्यात सर्व तालुक्यांत मिळून एकूण ७७ हजार ४00 शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. यापैकी ३६ हजार २0६ शौचालयांचे अनुदान लाभार्थ्यांना अदा केले. तर ४१ हजार १९४ लाभार्थ्यांचे अनुदान थकले आहे.
\पं.स.ला वर्ग करा : उपाध्यक्षांचा आदेश
हिंगोली जिल्ह्याला संपूर्ण स्वच्छता अभियानात केवळ १७ कोटी मिळाले आहेत. या निधीचे वितरण पंचायत समिती स्तरावर लवकरात लवकर करण्याचे आदेश जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी दिले आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत हा निधी पं.स.ला वर्ग होईल, असे सांगण्यात आले.
प्रोत्साहन अनुदानाचा निधी रखडल्याने मागील वर्षभरापासून लाभार्थी पंचायत समितीत खेटे मारत आहेत. आता अपुराच निधी आला. तोही बांधकाम फोटो अपलोडिंगप्रमाणे वितरित होणार असल्याने अनेक पंचायत समित्यांची गोची होणार आहे.
जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती करून शौचालय बांधकाम तर झाले. मात्र वापरच होत नसल्याची बोंब सगळीकडेच होत आहे. त्यामुळे यावर पुन्हा प्रशासनाने कारवाई करण्याची गरज असून अन्यथा अनुदान परत घेतले पाहिजे.
तालुकानिहाय आवश्यक निधी
बांधलेली अनुदान अनुदान लागणारा
तालुका शौचालये वितरित शिल्लक निधी(कोटी)
औंढा ११९0१ ७४३८ ४४६३ ५.३५
वसमत १७१0६ ७७0३ ९४0३ ११.२८
हिंगोली १२६३२ ५00९ ७६२३ ९.१४
कळमनुरी १८0९४ ७३८६ १0७0८ १२.८४
सेनगाव १७६६७ ८६७0 ८९९७ १0.७९

Web Title:  'Total cleanliness' receives 17 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.