शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 08:24 PM2024-05-17T20:24:42+5:302024-05-17T20:27:50+5:30

शरीरातील कोलेस्टेरॉल डायट आणि नियमित एक्सरसाइजच्या माध्यमानेही कमी केले जाऊ शकते. यातच, घरातील काही हर्बल्स आणि मसालेही यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुळस आणि हळद या दोन गोष्टी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

Turmeric and Tulsa are the very effective to reduce bad cholesterol in the body Use it like this | शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर

शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर

आपल्या शरीरात हार्मोन्स, व्हिटॅमिन डी आणि डायजेशनला मदद करणारे तत्व बनविण्यासाठी कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. खरे तर, आपले शरीर आवश्यकतेनुसार कोलेस्टेरॉल तयार करत असते. मात्र आपण जे अन्न घेतो, त्यातूनही आपल्या शरीराला अधिकचे कोलेस्टेरॉल मिळते. महत्वाचे म्हणजे, हे अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यासाठी शरीरात एक प्रणाली असते. मात्र, जेव्हा त्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक वाढते, तेव्हा ते प्रकृतीसाठी घातक ठरू शकते. रक्तातील अधिकचे कोलेस्टेरॉल हृदयविकाराचा धोकाही वाढवू शकते. कारण ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करते.

शरीरातील कोलेस्टेरॉल डायट आणि नियमित एक्सरसाइजच्या माध्यमानेही कमी केले जाऊ शकते. यातच, घरातील काही हर्बल्स आणि मसालेही यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुळस आणि हळद या दोन गोष्टी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

असा करा हळदीचा वापर -
- शरीरातून बॅड कोलेस्टेरॉल काढण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चिमूट हळद विरघळून ते पाणी प्या. 
- हळदीचे दूध प्यायल्यानेही बॅड कोलेस्टेरॉल कमी होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
- हळदीचा चहा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. हळदीचा चहा बनवण्यासाठी एक कप पाण्यात चिमूटभर हळद, आल्याचा एक छोटा तुकडा आणि काळी मिरी घालून चांगल्या प्रकारे उकळून घ्या.

असा करा तुळशीचा वापर - 
- रोज सकाळी 8 ते 10 तुळशीची पाने पाण्यात उकळून प्या. चवीनुसार त्यात लिंबू अथवा मधही घालू शकता.
- तुळशीची पाने चावून खाल्ल्यानेही कोलेस्टेरॉल कमी होते आणि शरीर डिटॉक्स होते.

Web Title: Turmeric and Tulsa are the very effective to reduce bad cholesterol in the body Use it like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य