पुरूषांमध्ये हाय ब्लड प्रेशरची दिसतात ही लक्षणं, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:41 AM2024-04-25T10:41:28+5:302024-04-25T10:42:02+5:30

High Blood Pressure: वेळीच या समस्येची ओळख पटवली तर मोठा धोका टळू शकतो. आज अशीच काही लक्षण आम्ही सांगणार आहोत.

These are the symptoms of high blood pressure in men | पुरूषांमध्ये हाय ब्लड प्रेशरची दिसतात ही लक्षणं, वेळीच व्हा सावध!

पुरूषांमध्ये हाय ब्लड प्रेशरची दिसतात ही लक्षणं, वेळीच व्हा सावध!

High Blood Pressure: हायपरटेंशन किंवा हाय ब्लड प्रेशर ही एक गंभीर समस्या आहे. पण एक चिंतेची बाब अनेकांना हे माहीतच नसतं की, त्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे. जगभरात कोट्यावधी लोकांना हाय बल्ड प्रेशरची समस्या आहे. जर या समस्येकडे जास्त काळ दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हृदयासंबंधी अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशात वेळीच या समस्येची ओळख पटवली तर मोठा धोका टळू शकतो. आज अशीच काही लक्षण आम्ही सांगणार आहोत.

पुरूषांमध्ये हाय ब्लड प्रेशरची लक्षणं

1) छातीत नेहमीच वेदना होणं हाय ब्लड प्रेशरच्या सुरूवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. जर तुम्हाला नेहमीच छातीत दुखत असेल तर हाय ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधी आजाराचा संकेत असू शकतो.

2) ब्लड प्रेशर वाढल्यावर सतत डोकेदुखी होत राहते. डोकं दुखण्याची तशी तर अनेक कारणे असतात. पण हाय ब्लड प्रेशरही डोकं दुखण्याचं एक कारण असू शकतं.

3) श्वास घेण्यास समस्या होत असेल तर हे हाय बीपीचं सुरूवातीचं लक्षण असू शकतं. पुन्हा पुन्हा दम लागणे आणि श्वास घेताना छातीत वेदना होणं हाय ब्लड प्रेशरचा संकेत असू शकतो.

4) हायपरटेंशनमुळे दिसण्यातही समस्या होते. ज्या पुरूषांना धुसर दिसत असेल किंवा दिसण्यासंबंधी काही समस्या होत असेल तर त्यांनी लगेच हाय बीपीची टेस्ट करावी.

5) हाय ब्लड प्रेशरमुळे नाकातून रक्तही येतं. जेव्हा ब्लड प्रेशर गरजेपेक्षा जास्त वाढतं. तेव्हा नाकातून रक्त येतं. अशात डॉक्टरांना दाखवून लगेच ब्लड प्रेशरची टेस्ट करावी आणि योग्य उपचार घ्यावे.

Web Title: These are the symptoms of high blood pressure in men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.