प्राण्यांमुळे नाही तर मनुष्यांमुळे त्यांच्यात पसरतात दुप्पट वायरस, पुढील धोका 'या' आजाराचा....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 03:14 PM2024-03-27T15:14:49+5:302024-03-27T15:15:22+5:30

आता एक असा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आलं आहे की, प्राण्यांपेक्षा मनुष्यांनी त्यांना जास्त व्हायरसने संक्रमित केलं आहे.

Humans spread and infect more viruses to animals says new study | प्राण्यांमुळे नाही तर मनुष्यांमुळे त्यांच्यात पसरतात दुप्पट वायरस, पुढील धोका 'या' आजाराचा....

प्राण्यांमुळे नाही तर मनुष्यांमुळे त्यांच्यात पसरतात दुप्पट वायरस, पुढील धोका 'या' आजाराचा....

कोरोना महामारी आली तेव्हा अनेक लोकांनी दावा केला होता की, वटवाघळांच्या माध्यमातून ही महामारी मनुष्यांमध्ये पसरली. या महामारीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. पण आता एक असा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आलं आहे की, प्राण्यांपेक्षा मनुष्यांनी त्यांना जास्त व्हायरसने संक्रमित केलं आहे.

व्हायरस पसरण्याचा मार्ग एकतर्फी राहिला नाही. हा दोन्हीकडून होतो. सध्या असलेल्या वायरल जीनोमचा रिसर्च केल्यानंतर हैराण करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. मनुष्य जनावरांना दुप्पट व्हायरस देतात. पण जनावरे असं करत नाही. वैज्ञानिकांनी 1.20 कोटी वायरस जीनोमचा अभ्यास केला आणि डेटा बघितला.
त्यातून असं समोर आलं की, 3 हजार केसेस अशा आहेत ज्यात वायरस एका प्रजातीच्या जीवातून दुसऱ्या प्रजातीच्या जीवांमध्ये जातात. यातील 79 टक्के वायरस असे आहेत जे एका जनावराच्या प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीच्या जनावरात जातात. 21 टक्के असे वायरस आहेत जे मनुष्यांद्वारे पसरतात.

मनुष्य अनेक प्राण्याना संक्रमित करतात

या तीन हजार वायरसच्या केसेसपैकी 64 टक्के असे वायरस आहेत जे मनुष्यांमधून जनावरांमध्ये जातात. यांना एंथ्रोपोनोसिस म्हणतात. केवळ 36 टक्के असे वायरस आहेत जे जनावरांमधून मनुष्यांमध्ये जातात. वायरसच्या अदला-बदलीला यूनोसिस म्हटलं जातं.

एंथ्रोपोनोसिसचा शिकार होणाऱ्या प्राण्यांमध्ये पाळीव मांजरी, श्वान, घोडे, डुक्कर यांचा समावेश असतो. त्याशिवाय कोंबड्या, बदक, चिम्पांजी, गोरिल्ला, माकड, उंदीरही याचे शिकार होतात. 

यूनिवर्सिटी कॉलेज लंडनचे जेनेटिक इंस्टीट्यूटमध्ये डॉक्टोरल स्टूडंट सेड्रिक टॅनने सांगितलं की, मनुष्य पर्यावरणावर अनेक पद्धतीने प्रभाव टाकत असतो. मग ते प्राणी असो वा झाडी. हा रिसर्च नुकताच नेचर इकोलॉजी एंड इवोल्यूशन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

मनुष्यांना पुढील धोका बर्ड फ्लू H5N1 चा

सेड्रिकने सांगितलं की, जेव्हाही एखादा वायरस एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीमध्ये जातो तेव्हा तो आपल्या टागरेटच्या हिशेबाने आधीच स्वत:त बदल करतो. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या महामाऱ्यांनी मनुष्यांचा जीव घेतला आहे. कारण वायरस, पॅथोजेन आणि बॅक्टेरिया आहेत.

जूनोसिस म्हणजे प्राण्यांमधून मनुष्यांमध्ये येणाऱ्या आजारांमुळे जगभरात चिंता आहे. मनुष्यांमध्ये येणाऱ्या वायरसचं कारण कुठेना कुठे प्राणीच आहेत. जे कधीही मनुष्यांमध्ये शिरू शकतात. सध्या सगळ्यात जास्त धोका बर्ड फ्लू H5N1 बाबत आहे. ही समस्या वेगाने जंगली पक्ष्यांमध्ये पसरत आहे.

Web Title: Humans spread and infect more viruses to animals says new study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.