या गंभीर आजारामुळेही काळी होते मान, जाणून घ्या काळपटपणा दूर करण्याचे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:35 AM2024-04-15T11:35:20+5:302024-04-15T11:35:50+5:30

मानेवर जमा झालेली धूळ,  माती आणि पॉल्यूटेंट्सच्या थरामुळे मानेवर काळ्या लाइन्स दिसतात. 

How to get rid of dark neck, you should know this | या गंभीर आजारामुळेही काळी होते मान, जाणून घ्या काळपटपणा दूर करण्याचे उपाय!

या गंभीर आजारामुळेही काळी होते मान, जाणून घ्या काळपटपणा दूर करण्याचे उपाय!

Home Remedies For Dark Neck : अनेकदा आपल्या दिसतं की, चेहरा आणि मानेच्या रंगात फरक असतो. जास्तीत जास्त लोक चेहऱ्याची जास्त काळजी घेतात. ज्यामुळे मानेच्या रंगात बदल होतो. पण चेहऱ्याचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी मानेची काळजी घेणंही गरजेचं आहे. मानेवर जमा झालेली धूळ,  माती आणि पॉल्यूटेंट्सच्या थरामुळे मानेवर काळ्या लाइन्स दिसतात. 

स्किन केअर एक्सपर्टनुसार, लोक मानेची खास काळजी घेत नसल्याने मानेचा रंग काळा होतो. त्याशिवाय लठ्ठपणामुळे होणारी एकॅन्थोसिस निगरिकन्समुळेही मानेवर थर जमा होतो. ज्यामुळे त्वचेचा काळपटपणा वाढतो. डर्माटाइटिस नेगलेक्टा, स्किन पिगमेंटेशन आणि डायबिटीसमुळेही मानेची त्वचा काळी पडते. हेल्दी त्वचेसाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्याच आज जाणून घेऊ.

मानेचा काळपटपणा कसा दूर कराल

1) मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी 4 चमचे खोबऱ्याच्या तेलात 2 चमचे तांदळाचं पिठ टाका. या मिश्रण तयार करा आणि स्क्रब मानेवर घासा.

2) बटाट सोलून त्याला बारीक करा आणि त्याचा रस काढा. याने मानेवरील मळ-माती दूर करण्यास मदत मिळते. बटाट्यामध्ये आढळणाऱ्या रिबोफलेविन आणि व्हिटॅमिन सी चं प्रमाण स्किन ब्राइटनिंगमध्ये मदत करतात. तेच बेकिंग सोड्याने त्वचा साफ होते.

3) मानेची तत्वा उजळवण्यासाठी 2 चमचे दह्यात 1 चमचा बेसन आणि लिंबाचा रस मिक्स करा. हा लेप मानेवर लावा. आंघोळीच्या आधी हा लेप मानेवर लावा. हा लेप 5 ते 10 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर साफ करा. याने त्वचा मॉइश्चराइज होते आणि काळपटपणाही दूर होतो.

4) ओटमील त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत करतात. ओटमील ग्राइंड करून पाडवर बनवा. आता यात थोडं मध टाका आणि हे मिश्रण मानेवर लाव. हे लावून काही वेळ मानेची मसाज करा आणि नंतर पाण्याने मान साफ करा.

5) मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी 2 चमचे पपईच्या पल्पमध्ये अर्धा चमचा तुरटी टाका. हे मानेवर लावा. 

Web Title: How to get rid of dark neck, you should know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.