गोव्यातील मडगावात अपघातात एक ठार, तर एकजण जखमी

By सूरज.नाईकपवार | Published: May 18, 2024 12:07 PM2024-05-18T12:07:46+5:302024-05-18T12:08:51+5:30

पिकअपने रस्ताशेजारी उभ्या करुन ठेवलेल्या टाटा एस, ट्रक व अशोक लेयलँडच्या इन्सुलेटेड ट्रकला धडक दिली.

One killed, one injured in an accident in Margaon in Goa | गोव्यातील मडगावात अपघातात एक ठार, तर एकजण जखमी

गोव्यातील मडगावात अपघातात एक ठार, तर एकजण जखमी

लोकमत न्युज नेटवर्क

मडगाव: गोव्यातील मडगावच्या एसजीपीडीएच्या घाउक मासळी मार्केटजवळ आज शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात कुयरो वेळीप (५५, मोरपिर्ला ) हा ठार झाला तर चालक दीपक गावकर ( ३१, खाेतीगाव ,काणकोण) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार चालू आहे.ते दोघेही एका पिकअपमध्ये होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व त्याने नंतर तेथे पार्क करुन ठेवलेल्या तीन वाहनाला धडक दिली होती.

पिकअपने रस्ताशेजारी उभ्या करुन ठेवलेल्या टाटा एस, ट्रक व अशोक लेयलँडच्या इन्सुलेटेड ट्रकला धडक दिली. पहाटे सव्वातीन च्या दरम्यान अपघाताची वरील दुदैवी घटना घडली. ज्या पिकअपला अपघात झाला त्याची दारेबंद झाल्याने आत अडकलेल्या दोघांनाही बाहेर काढणे मुश्किल होउन बसले होते. त्यामुळे साधारणात अर्धातास ते दोघेही आतच अडकून पडले होते.

मडगाव अग्निशमन दलाचे जवान व उपस्थित नागरिकांनी नंतर गाडीचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले. व लागलीच येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी कुयरलो याला मृत घोषीत केले. या अपघात प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी पिकअप चालक दीपक गावकर याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: One killed, one injured in an accident in Margaon in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात