Goa: धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय सरदेसाईंना टोला

By वासुदेव.पागी | Published: April 18, 2024 02:18 PM2024-04-18T14:18:54+5:302024-04-18T14:19:45+5:30

Goa Lok Sabha Election 2024: धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा आहे असे जर विजय सरदेसाई यांना वाटत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे. धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही. भाजप ब्रँड सर्वात मोठा असून तो देशव्यापी आणि सर्वव्यापी आहे असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. 

Goa: Dhempo brand is not bigger than BJP, Chief Minister Pramod Sawant's Vijay Sardesai taunts | Goa: धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय सरदेसाईंना टोला

Goa: धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय सरदेसाईंना टोला

- वासुदेव पागी
पणजी - धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा आहे असे जर विजय सरदेसाई यांना वाटत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे. धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही. भाजप ब्रँड सर्वात मोठा असून तो देशव्यापी आणि सर्वव्यापी आहे असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. 

भाजपाच्या पणजीतील मुख्यालयात ‘मोदी की गँरंटी’ या संकल्प पत्राचे अनावरण केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सांगितले. यावेळी भाजपचे दोन्ही जिल्ह्यातील उमेदवार केंद्रीयमंत्री  श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंम्पे तसेच राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तनावडे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की पल्लवी धेंम्पो ही उमेदवार म्हणून भाजपची निवड आहे. त्यांच्या कामाची आणि लोकप्रियतेची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही उमेदवारी दिली आहे. धेम्पो उद्योग समूह मागील अनेक वर्षांपासून गोव्यात यशस्वीपणे कार्यरत आहे आणि सामाजिक क्षेत्रातही त्याचे काम आहे. त्यामुळे धेम्पो समुहाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. परंतु याचा अर्थ धेम्पो ब्रँड हा भाजपपेक्षा मोठा नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजपने दक्षिण गोव्याची उमेदवारी पल्लवी धेंम्पे यांना जाहीर केल्यावर आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपर टीका करताना भाजपला धेम्पो ब्रँड हा पक्षापेक्षा मोठा वाटत असल्याचे म्हटले होते. या त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

Web Title: Goa: Dhempo brand is not bigger than BJP, Chief Minister Pramod Sawant's Vijay Sardesai taunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.