Gadchiroli - Dhanora राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा मुक्तसंचार; बिबट्याचाही कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 06:00 PM2022-11-19T18:00:55+5:302022-11-19T18:01:25+5:30

दुधमाळ्यात हल्ल्यात गाय जखमी

Free movement of tiger in Gadchiroli-Dhanora National Highway; leopard spotted also | Gadchiroli - Dhanora राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा मुक्तसंचार; बिबट्याचाही कहर

Gadchiroli - Dhanora राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा मुक्तसंचार; बिबट्याचाही कहर

googlenewsNext

धानोरा (गडचिरोली) :गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात वाघांची दहशत वाढली असताना आणि अनेक नागरिकांचे बळीही गेले असताना आता धानोरा तालुक्यातही वाघ-बिबट्याची दहशत पसरत आहे. गडचिरोली-धानोरा या राष्ट्रीय महामार्गावरील दुधमाळा गावाजवळ चक्क एक पट्टेदार वाघ महामार्गावर बिनधास्तपणे फिरताना आढळला.

बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास धानोरा येथील नागरिक चारचाकी वाहनाने गडचिरोली येथून धानोरा येथे येत असताना दुधमाळा ते काकडवेलीदरम्यान मुख्य मार्गावर पट्टेदार वाघ रस्ता पार करीत असल्याचे दिसून दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुधमाळाचे क्षेत्र सहायक डी. एल. आदे यांनी या घटनेला दुजोरा दिला. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

पट्टेदार वाघ ज्या गावाजवळ दिसला, त्या दुधमाळा गावातील कृष्णकांत मडावी यांच्या गाईवर दि. १६ च्या रात्री ९ वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यात ती गाय जखमी झाली. गावाला लागून असलेल्या कक्ष क्र. ४६५ मध्ये ही घटना घडली. गाईच्या हंबरण्याच्या आवाजाने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बिबट्या पळून गेला. त्यामुळे गाईचे प्राण वाचले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. जखमी गायीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार केळवटकर, क्षेत्रसहाय्यक डी. एल. आदे, वनरक्षक एन. एन. टोंगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दुधमाळा परिसरात दोन बिबटे फिरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन क्षेत्र सहाय्यक आदे यांनी केले.

Web Title: Free movement of tiger in Gadchiroli-Dhanora National Highway; leopard spotted also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.