ई-पीक नोंदणीच्या अनेक भानगडी; शेतकरी त्रस्त

By दिगांबर जवादे | Published: May 6, 2024 06:10 PM2024-05-06T18:10:17+5:302024-05-06T18:11:43+5:30

नवीन व्हर्जन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी : पोर्टलवरील खाते क्रमांकावर दुसऱ्यांचीच नावे

Farmers are tired of e-Peak registration | ई-पीक नोंदणीच्या अनेक भानगडी; शेतकरी त्रस्त

Farmers are tired of e-Peek registration

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
हमीभाव केंद्रावर धान्याची विक्री करण्यासाठी सातबारावर ई-पीक नोंदणी होणे आवश्यक आहे. मात्र, महसूल विभागाने ई-पीक नोंदणीचा नवीन व्हर्जन आणला आहे. त्यात अनेक तांत्रिक चुका असल्याने ई-पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे हे पोर्टल चार दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. त्यामुळे नोंदणी करताना शेतकऱ्यांचा गोंधळ  उडत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याने शेतात नेमकी कोणत्या पिकाची लागवड केली आहे, हे समजण्यासाठी ई-पीक नोंदणी आवश्यक आहे. मागील चार वर्षांपासून ई-पीक नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. 

त्याशिवाय शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येत नाही. पूर्वीच्या व्हर्जनमध्ये शेताचा केवळ फोटो काढून अपलोड केला तरी चालत होते. मात्र, महसूल विभागाने आता नवीन व्हर्जन आणले आहे. त्यात शेतीचा सर्व्हे क्रमांक टाकल्यानंतर आपोआप शेताचा नकाशा दाखवते. शेतकरी जर शेतात असेल जीपीएस शून्य असल्याचे दाखवते. शेतकरी जर दुसऱ्याच्या शेतात असेल तर त्या जागेपासून त्याचे शेत किती दूर व कोणत्या दिशेला आहे, अशा सूचना ई- पीक पोर्टल संबंधित शेतकऱ्याला करते. जोपर्यंत जीपीएसवर शून्य येत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला पुढे जावे लागते. नवीन व्हर्जन चांगले असले तरी त्यात नकाशे अपलोड करतेवळी काही गोंधळ तांत्रिक चुका राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने स्वतःच्या शेताचा सव्हें क्रमांक टाकून स्वतःच्या शेतात उभा राहिल्यानंतरही जीपीएसवर शून्य दाखवत नाही. दुसन्याच्या शेतात गेल्यानंतर शून्य दाखवत आहे. त्या शेतात जर पिकाची लागवडच झाली नसेल तर पडीक शेतीचा फोटो काढावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पीक निघाले तरी ई-पीक पाहणी झालीच नाही
शासकीय धान खरेदी केंद्रावर उन्हाळी धानाची विक्री करण्यासाठी दरवर्षी ३० एप्रिलपर्यंत मुदत राहात होती. मात्र, यावर्षी ई-पीक पोर्टलच सुरू झाले नव्हते. त्यामुळे धानासाठी नोंदणीची प्रक्रिया थांबली होती. २८ एप्रिलला पोर्टल सुरु झाले. त्यानंतर शेतकरी ई-पीक नोंदणी करत आहेत. त्यातही अनेक अडचणी येत आहेत. काही शेतकऱ्यांनी धानाची मळणी सुरू केली आहे. मात्र, पोर्टल सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.


शेतातील कचऱ्याची विल्हेवाट
खरीप पिकांच्या मशागतीला काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यात सर्वप्रथम शेतातील गवत जाळले जाते. गवत जाळल्याने प्रदूषण होते तसेच जमिनीची धूप होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कचरा जाळू नये, असा सल्ला कृषी विभागाचे अधिकारी देत असले, तरी शेतकरी आग लावतात. कमी श्रमात शेताची साफसफाई होत असल्याने चामोर्शी तालुक्यातील बहुतांश शेतकरी हाच पर्याय निवडत असल्याचे दिसून येते.


काय आहेत तांत्रिक चुका?

• महसूल विभागाने ई-पीक नोंदणीचे नवीन व्हर्जन आणले आहे. त्यात जमिनीचा भूमापन क्रमांक टाकल्यानंतर जमिनीचा नकाशा येतो. नकाशा बरोबर असेल तर जीपीएस शून्य दाखवते. 
• मात्र, जमिनीचे नकाशे अपलोड करताना काही तांत्रिक चुका राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीचा भूमापन क्रमांक टाकल्यानंतरही दुसऱ्या शेतकऱ्याचा नकाशा दाखवत आहे.


उन्हाळी धान पिकाची कापणी, मळणी झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत ई-पीक व धान विक्रीसाठी नोंदणी झाली नाही. त्यामुळे विक्री कधी होणार? हा प्रश्न आहे. बरेच शेतकरी शेतावरून धान थेट विक्री केंद्रावर नेत होते. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचत होता. आता मात्र धान घरी साठवून ठेवण्याची पाळी शेतकऱ्यांवर येणार आहे.
- वामनराव राजगिरे, शेतकरी, चोप

बरेच शेतकरी उन्हाळी धान विकून त्यातून खरिपाच्या पिकासाठी मशागत करतात. मात्र, अजूनपर्यंत नोंदणीच झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिता वाढली आहे. पाऊस पडल्यानंतर शेतीची कामे करणार की, धानाची विक्री करण्यासाठी धान खरेदी केंद्रावर येरझाऱ्या घालणार हा प्रश्न आहे.
- ओंकार वासनिक, शेतकरी, चोप

Web Title: Farmers are tired of e-Peak registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.