'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 01:41 PM2024-05-18T13:41:57+5:302024-05-18T13:50:31+5:30

Shahrukh khan: सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ incredible.srk नावाच्या एका पेजवर शेअर  करण्यात आला आहे.

shah-rukh-khan-respect-hijab-girl-came-in-front-everyone-king-khan-in-fans-hearts | 'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन

'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (shahrukh khan) त्याच्या सिनेमासोबतच त्याच्या नम्र स्वभावामुळेही कायम चर्चेत येत असतो.  सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका हिजाब घातलेल्या तरुणी त्याच्यासमोर आली. या तरुणीला पाहताच क्षणी तो ज्या पद्धतीने रिअॅक्ट झाला ते पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ incredible.srk नावाच्या एका पेजवर शेअर  करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका मंचावर शाहरुखचे काही चाहते त्याला भेटायला आले होते. आपल्या चाहत्यांना पाहिल्यावर शाहरुखने प्रत्येकासोबत हात मिळवला आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. मात्र, या चाहत्यांमध्ये एक हिजाब घातलेली तरुणीदेखील होती. या तरुणीला पाहून शाहरुखने पटकन तिला आदाब केलं.

दरम्यान, शाहरुखने या तरुणीचा संस्कृतीचा आणि तिचा मान राखत तिला आदब केलं. त्याचे हे वर्तन पाहून चाहते त्याच्यावर कमालीचे खुश झाले. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून त्यावर नेटकरी कमेंट आणि लाइकचा वर्षाव करत आहेत. 'महिलांचा आदर कसा करावा हे शाहरुखकडून शिकावं',असं एकाने म्हटलं आहे. 'तू खरा किंग खान आहे', ' ‘शाहरुख खान ऑट टाईम बेस्ट आहे….', 'हा खरा शाहरुख खान आहे', असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच कौतुक केलं आहे.

Web Title: shah-rukh-khan-respect-hijab-girl-came-in-front-everyone-king-khan-in-fans-hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.