83 Movie Review: कपिल देव यांनी जिंकला ८३ वर्ल्डकप, 'रण'वीर चा '८३' जिंकतो मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:57 PM2021-12-22T16:57:40+5:302023-08-08T20:09:54+5:30

83 Movie Review: स्कोर क्या है? जाणून घ्या कसा आहे रणवीर सिंगचा ‘83’ हा चित्रपट

83 Movie Review Team Kabir Khan and Ranveer Singh movie 83 review in marathi | 83 Movie Review: कपिल देव यांनी जिंकला ८३ वर्ल्डकप, 'रण'वीर चा '८३' जिंकतो मनं

83 Movie Review: कपिल देव यांनी जिंकला ८३ वर्ल्डकप, 'रण'वीर चा '८३' जिंकतो मनं

Release Date: December 24,2021Language: हिंदी
Cast: रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, जीवा, हार्डी संधु, ताहिर भसीन, चिराग पाटील, पंकज त्रिपाठी, आदिनाथ कोठारे आदी
Producer: दीपिका पादुकोण, कबीर खानDirector: कबीर खान
Duration: 2 तास 32 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

- चित्राली चोगले

१९८३ मध्ये भारताने क्रिकेटच्या नकाशावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि कपिल देव आणि टीमने वर्ल्डकप घरी आणला. तो सगळा काळ पुन्हा एकदा जसाच्या तसा उभा करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला आहे दिग्दर्शक कबीर खान आणि रणवीर सिंह सोबत १४ अभिनेत्यांनी. किती यशस्वी ठरला आहे हा त्यांचा प्रयत्न हे अगदी एका शब्दात सांगायचं झालं तर या सगळ्यांनी भली मोठी सिक्स मारली आहे असं म्हणण चुकीचं ठरणार नाही. दिग्दर्शन, कास्टिंग, अभिनय आणि लिखाण अगदी सगळ्याच बाजू इतक्या उत्तम जमून आल्या आहेत की क्या बात. (83 Movie Review)

८३ सिनेमाची गोष्ट काही एखाद्या भारतीयासाठी नवीन नाही. ज्यांनी तो काळ अनुभवला आहे आणि ज्यांनी त्याचे किस्से ऐकलेत-वाचलेत त्यांच्यासाठी हा सिनेमा ही एक सिनेमॅटिक पर्वणी आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून सिनेमा आपल्याला खिळवून ठेवतो ते अगदी शेवटच्या फ्रेमला उर अभिमानाने भरलेला असतो आणि डोळ्याच्या कडा पाणावलेल्या. सिनेमात रणवीर सिंगने (Ranveer Singh) कपिलदेव (Kapil Dev) यांची भूमिका साकारली आहे. खरं तर त्यांनी ती भूमिका साकारली आहे हे म्हणणं चुकीचं आहे कारण तो ही भूमिका जगलाय. फक्त हुबेहूब कपिल देव यांच्यासारखं दिसणं नाही, चालणं-बोलणं नाही तर त्यांचा आवाज सुद्धा रणवीरने अगदी चोख निभावून नेलाय. त्याचसोबत इतर कलाकार मग तो श्रीकांत साकारणारा जिव्वा असो किंवा मोहिंदर अमरनाथ साकारणारा सकिब सलीम, सगळ्यांनीच कामं उत्तम केली आहेत. अगदी नेहमीप्रमाणे पंकज त्रिपाठी सुद्धा भाव खाऊन जातात. पण मनात राज्य करतो तो रणवीरचा कॅपसी. आणि दुधावरची साय ठरते रणवीर-दीपिका यांची केमिस्ट्री. कपिल आणि रोमी म्हणून काय सहज वावरले आहेत.

दिग्दर्शक कबीर खान यांनी हा शिवधनुष्य इतक्या उत्तम रित्या पेलला आहे की काही ठिकाणी काही सीन्स किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी तो सगळा काळ आपल्या डोळ्यासमोर तो उभा करत नाही तर आपल्याला त्यात रमवतो सुद्धा. बरं या सिनेमात काही छोट्या-छोट्या गोष्टी इतक्या उत्तम रित्या गुंफल्या गेल्या आहेत की भारतीय असल्याचा अभिमान वारंवार होत राहतो. या सिनेमात सगळं आहे, भारतीय क्रिकेट टीमने १९८३ला सहन केलेला अपमान, त्यांची जिद्द, त्यांचा उत्साह आणि आपला वर्ल्डकप. या सिनेमात खुद्द कपिल देव आणि सचिन तेंडुलकर सुद्धा आहेत बरं. ते कसे त्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. आणि तो पाहिल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा तो पहावासा वाटला नाही तरच नवल. 

सिनेमात सगळ्यांनी सिक्सर मारला आहे. ८३ हा एक अनुभव आहे जो प्रत्येक भारतीयाने घ्यावा. शिट्ट्या टाळ्या आणि डोळ्यातून येणारं पाणी, सिनेमागृहाचं झालेलं स्टेडियम, हे सगळं घेऊन प्रत्येक जण घरी जाईल हे नक्की. लक्षात ठेवा सिनेमातलं रणवीर म्हणजेच कपिल देव यांचं वाक्य, 'I say again,We here to Win'... या ८३ सिनेमासाठी अगदी तंतोतंत खरं ठरतं. They are here to Win'...

Web Title: 83 Movie Review Team Kabir Khan and Ranveer Singh movie 83 review in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.