Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं

By देवेंद्र जाधव | Published: May 13, 2024 02:28 PM2024-05-13T14:28:19+5:302024-05-13T14:28:48+5:30

श्रेयस तळपदेने आगामी 'कर्तम् भुगतम्' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने लोकमत फिल्मीशी बोलताना सध्याचं निवडणुकीचं वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी भाष्य केलंय (shreyas talpade, narendra modi, kartam bhugtam)

pm narendra modi again elected in lok sabha election 2024 shreyas talpade prediction | Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं

Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं

अभिनेता श्रेयस तळपदे हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. केवळ मराठीच नाही तर हिंदी बॉलिवूड इंडस्ट्रीतही श्रेयस तळपदेने स्वतःची ओळख निर्माण केली.  श्रेयस तळपदेच्या आगामी 'कर्तम् भुगतम्' सिनेमाची सर्वांना खूप उत्सुकता आहे. एका वेगळ्याच विषयावरचा हा अनोखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्त श्रेयसने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत संवाद साधला. त्यावेळी श्रेयसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेऊन सध्याच्या राजकीय वातावरणाविषयी त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या.

श्रेयस तळपदेने मुलाखतीत सांगितलं की, "सध्याच्या राजकारणाकडे बघायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मला कौतुक आहे. गेली १० वर्ष मोदीजी देशाचं काम करत आहेत. ते आधी देशाचा विचार करतात. अटलबिहारी वाजपेयी सुद्धा असेच होते. जनतेचा कौल नरेंद्र मोदीजी यांच्याकडे आहे. त्यामुळे एकूणच सध्याचं वातावरण पाहता नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हं आहेत."

अशाप्रकारे श्रेयस तळपदेनी सध्याचंं वातावरण पाहता पुन्हा एकदा मोदीजी निवडून येतील, असं सांगितलं आहे. श्रेयसच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर.. त्याच्या 'कर्तम् भुगतम्' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. सिनेमात श्रेयससोबत अभिनेता विजय राज झळकत आहे. विजय आणि श्रेयस या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी सिनेमात बघायला मिळणार आहे. हा सिनेमा १७ मेला सिनेमागृहांमध्ये रिलीज होतोय.

Web Title: pm narendra modi again elected in lok sabha election 2024 shreyas talpade prediction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.